शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

४२९ संसाराच्या पुन्हा जुळल्या रेशीमगाठी

By admin | Updated: August 19, 2015 02:15 IST

लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात, असे म्हटले जाते; मात्र लग्नानंतर समज गैरसमजामुळे निर्माण होणाऱ्या कलहावरचे उत्तर पृथ्वीवरच मिळते.

महिला तक्रार निवारण केंद्राचे कार्य : जिल्ह्यात चार केंद्रातून चालतो कारभारगौरव देशमुख वर्धा लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात, असे म्हटले जाते; मात्र लग्नानंतर समज गैरसमजामुळे निर्माण होणाऱ्या कलहावरचे उत्तर पृथ्वीवरच मिळते. वाद विकोपाला जाऊन विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या संसाराला नवसंजीवनी देण्याचे काम पोलीस अधीक्षक कार्यालयायातील महिला तक्रार निवारण केंद्रातून चालत आलेले आहे. या केंद्रातून यंदाच्या वर्षातील सात महिन्यात विस्कटलेल्या ४२९ संसाराच्या गाठी पुन्हा जोडण्यात आल्या आहेत.या केंद्राने जानेवारी ते जुलै या सात महिन्यात तुटणाऱ्या संसाराची घडी बसवित त्यांना ‘नांदा सौख्य भरे’ हा कानमंत्र दिला. पती-पत्नी संसाराची दोन चाके असून यातील एक चाक जरी अविश्वास, संशयाच्या गाळात रूतले तर संसाराचा गाडा मध्येच थांबतो. थेट घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण पोहोचते. अनेकांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. तेथील फेऱ्या मारण्यातच काळ सरतो. नवरा बायको सोबतच त्यांच्या मुलांसह दोन्हीकडील कुटुंबाचीही वाताहत होते. शिवाय या दोन कुटुंबामध्ये निर्माण झालेले वैर आयुष्यभर राहते. छोट्या-छोट्या कारणामधून निर्माण झालेले गैरसमज केवळ सुसंवादाच्या अभावाने वाढत जातात. रेशीमगाठीचे बंध गळून पडतात. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्राची संख्या चार आहे. वर्धा जिल्ह्यातील तक्रार निवारण केंद्रामध्ये सेलू, हिंगणघाट, कारंजा हे तीन समुपदेशन केंद्र तसेच वर्धा येथे मुख्य केंद्र आहे.या तीन समुपदेशन केंद्रासह वर्धेच्या मुख्य महिला तक्रार निवारण केंद्रातील जानेवारी ते जुलै या सात महिन्यामध्ये दाखल झालेल्या ९२० तक्रारींपैकी ४२९ जणांच्या संसाराची घडी बसवण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्धा पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख शुभांगी वानखडे, मंदा ढवळे, सविता मुडे, वर्षा नगरकर व इतर महिला कर्मचारी तक्रारदाराचे समुपदेशन करून संसार तुटल्यावर होणारे परिणाम, त्याची गंभीरता, रागाच्या भरात घेण्यात येणार निर्णय याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. या सात महिन्यात एकूण ९२० अर्ज दाखल झाले आहेत. यातील ४२९ अर्ज समुपदेशनाने निकाली काढण्यात आले आहेत. यातील ४१० प्रकरणे प्रलंबित आहेत. २२ प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महिलावर होणाऱ्या स्वास्थ अधिकार कौटुंबिक हिंसाचार २००५ नुसार न्यायालयात एकूण ५९ प्रकरणे दाखल करण्यात आली असल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.