शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

वादळीवाऱ्याचा ३८३ घरांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 10:10 PM

शनिवार १ ते बुधवार ५ जून या कालावधीत वेळोवेळी आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने तब्बल ३८३ कुटुंबियांच्या घरांचे अंशत: नुकसान केले आहे. तर वीज पडून चार बैल, तीन गाई गतप्राण झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर कुकुप पालन केंद्रातील २०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देचार बैल, तीन गार्इंसह २०० कोंबड्यांचा मृत्यू : नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची अपेक्षाचिकणीत गोठा कोसळलापाच शेळ्या ठार : तीन शेळ्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शनिवार १ ते बुधवार ५ जून या कालावधीत वेळोवेळी आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने तब्बल ३८३ कुटुंबियांच्या घरांचे अंशत: नुकसान केले आहे. तर वीज पडून चार बैल, तीन गाई गतप्राण झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर कुकुप पालन केंद्रातील २०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. एकूणच या वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेकांच्या अडचणीत भरच टाकली आहे.अंगाला चटके देणाऱ्या उन्हीनंतर वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे थोडा का होईना उन्हापासून दिलासाच नागरिकांना मिळाला आहे. असे असले तरी या वादळीवाऱ्यासह पावसाने अनेकांच्या अडचीत भर टाकल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी भीषण जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांसह शेतकऱ्यांना आहे. ४ व ५ जून रोजी आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान वीज पडून अनुक्रमे देवळी तालुक्यात दोन बैल व एक गाय तर वर्धा तालुक्यात दोन बैल आणि आर्वी तालुक्यात दोन गार्इंचा मृत्यू झाला. शिवाय ५ रोजीच झालेल्या वादळीवाऱ्यामुळे देवळी तालुक्यातील एका कुकुट पालन केंद्रावरील छत उडाले. यातच सुमारे २०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची; शिवाय १ जूनला झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे १९८ तर ५ रोजीच्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे १८५ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनातील नैसर्गिक आपत्ती विभागाने घेतली आहे. ही नुकसानग्रस्त घर वर्धा, देवळी, हिंगणघाट तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले.चिकणीत गोठा कोसळलापाच शेळ्या ठार : तीन शेळ्या गंभीरलोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास परिसरात झालेल्या वादळीवाºयासह पावसादरम्यान चिकणी येथील एक गोठा कोसळला. यात दबून पाच शेळ्यांचा मृत्यू झाला तर तीन शेळ्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.दुपारी अचानक वातावरणात बदल घेत सोसाट्याच्या वाऱ्यासह परिसरात काही प्रमाणात पाऊस झाला. याच वादळीवाऱ्यामुळे प्रल्हाद डोमाजी भुरकुंडे यांच्या घराला लागून असलेला गोठा कोसळला. घटनेच्या वेळी गोठ्यात सुमारे २० शेळ्या होत्या. वादळ वाऱ्यामुळे गोठ्याची भिंत कोसळली. यात दबून एकूण पाच शेळ्या गतप्राण झाल्या.मृतक जनावरांमध्ये तीन बोकड तर दोन शेळ्यांचा समावेश आहे. तर तीन शेळ्यांची प्रकृती चिंताजणक असल्याचे सांगण्यात येते. शिवाय उर्वरित शेळ्यांना गोठ्याबाहेर सुखरूप बाहेर काढण्यात परिसरातील नागरिकांना यश आले.सदर घटनेमुळे शेळीपालक भुरकुंड यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाले आहे. शेळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अमोल पारोदे, अक्षय बहादुरे आदींनी विशेष सहकार्य केले.

टॅग्स :weatherहवामान