शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वर्धा जिल्ह्यात ३,६२८ गोवंशाला ‘लम्पी स्कीन डिसीज’ संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 21:51 IST

वर्धा जिल्ह्यात मनुष्यांवर कोविड-१९ विषाणू अटॅक करीत असताना गोवशांना ‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होत आहे.

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मनुष्यांवर कोविड-१९ विषाणू अटॅक करीत असताना गोवशांना ‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होत आहे. जिल्ह्यात ३ हजार ६२८ लम्पी स्कीन डिसीज बाधित जनावरांची नोंद आतापर्यंत घेण्यात आली असून त्यापैकी २ हजार ५१८ जनावरांनी त्यावर मात केली आहे. तर सध्यास्थितीत १ हजार ११० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूचा संसर्ग झालेल्या जनावरांच्या त्वचेवर छोट्या छोट्या गाठी येतात. अशातच जनावर अन्नपाणी सेवन करण्याचे सोडते. काही जनावरांचा या विषाणूजन्य आजारामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांच्या मनात दहशतीचे वातावरण आहे. पशूवैद्यकीय विभागाने केलेल्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणात केवळ गोवंशातच या आजाराची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गोपालकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या जनावरांना प्रतिबंधात्मक लस असलेली ‘गोट फॉक्स व्हॅक्सीन’ टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातील पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जनावराच्या नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथींना सूज येते. ताप येतो. दुध उत्पादन कमी होते. त्वचेवर १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात. बहूदा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होते.

उपचारासाठी तीन दिवस महत्त्वाचे‘लम्पी स्कीन डिसीज’ची लागण झालेल्या जनावराला वेळीच औषधोपचार मिळाल्यास त्या जनावराला जीवदान मिळू शकते. त्यामुळे जनावरांच्या त्वचेवर छोट्या छोट्या गाठी आढळून आल्यास किंवा त्याचे लक्षणे आढळून आल्यास पशुपालकांनी आपल्या जनावराला वेळीच पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन औषधोपचार करावा. औषधोपचार सुरू असलेल्या लम्पी स्कीन डिसीज बाधित गाय वर्गीय जनावरासाठी उपचार सुरू असलेले तीन दिवस महत्त्वाचे राहत असल्याचे पशुवैद्यकीय विभागातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

उपायुक्त कार्यालयाला शासनाने दिला लाखाचा निधीजिल्ह्यात एकूण २ लाख २५ हजार १८९ गोवंश असून आतापर्यंत ३ हजार ६२८ गाय वंशातील जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसीज’चा संसर्ग झाल्याची नोंद प्रशासनाने घेतला आहे. या विषाणूच्या प्रसाराला अटकाव घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न केले जात आहेत. तर शासनाकडून एक लाखाचा निधी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाला प्राप्त झाला आहे. वेळप्रसंगी हा निधी जिल्ह्याला ‘लम्पी स्कीन डिसीज’मुक्त करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य आजार आहे. जिल्ह्यात या आजाराची आतापर्यंत ३,६२८ गोवंशांना लागण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. हा विषाणूजन्य आजार जीवघेणा ठरू शकत असल्याने पशुपालकांनी आपल्या जनावरांना नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन प्रतिबंधात्मक लस द्यावी.- डॉ. प्रज्ञा गुल्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य