शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

जाणिवा झाल्या बोथट! ११ महिन्यांत ३५ हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

जिल्ह्यात हत्येसह महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यापर्यंत नराधमांनी मजल गाठली आहे. शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनींना आकर्षित करून विविध प्रकारची आमिषे दाखविले जातात. प्रेमजाळ्यात येताच शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात.

ठळक मुद्देसंडे अँकर । ४२ अत्याचार, ३८ ठिकाणी जीवघेण्या हल्ल्यांनी हादरला गांधी जिल्हा

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हैदराबाद येथे गेल्या महिन्यांपूर्वी काही तरुणांनी डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिचा खून केला. या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ३८ हत्या करण्यात आल्या तर अत्याचाराच्या ४२ घटना घडल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. ३८ ठिकाणी प्राणघातक हल्ले तर विनयभंगाचे १७२ गुन्हे घडले आहेत. त्यामुळे ‘ती’च्या धोक्यात आलेल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रात्रीचे सोडाच दिवसाही महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रस्त्यावर होणारी छेडखानी, तर कुठे कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाच्या वेदना असाह्य करणाऱ्या आहेत. ही बाब समाज व पोलिसही गांभीर्याने घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने महिला हा त्रास मुकाट्याने सहन करीत आहे.जिल्ह्यात हत्येसह महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यापर्यंत नराधमांनी मजल गाठली आहे. शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनींना आकर्षित करून विविध प्रकारची आमिषे दाखविले जातात. प्रेमजाळ्यात येताच शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. काही दिवस हा प्रकार चालल्यानंतर फसवणूक झाल्याची बाब उजेडात येते. मग न्यायासाठी पीडित पोलीस ठाण्याची पायरी चढतात. मित्र म्हणूनही विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्यांकडून संधी साधून अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काहींनी तर वडील, काका, मामा, भाऊ या पवित्र नात्यालाच काळिमा फासली आहे. पीडितेच्या सहनशक्तीचा बांध फुटल्यानंतर या घटनांना वाचा फुटते. अशा घटनांनी समाजमन हादरून गेले आहे. मागील ११ महिन्यांत ४२ ठिकाणी बलात्कार तर १७२ विनयभंग, ६०३ कौटुंबिक हिंसाचार, पळवून नेणे, अशा अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.अपहरणाचे ११० गुन्हेमहिला व मुलींना विविध प्रकारचे आमिषे दाखवून पळवून नेल्याच्या ११0 घटना वर्षभरात घडल्या आहेत. त्यापैकी काही गुन्हे उघडकीस आले आहेत. यातही नातेवाईक, प्रियकर, मित्रांकडूनच हे कारनामे झाले असल्याची पोलिसांत नोंद आहे.१८७ ठिकाणी घरफोड्या; ५५८ चोऱ्याजिल्ह्यात चोरी, घरफोडींचे सत्र वाढत असून पोलीस विभाग चोरट्यांवर वचक बसविण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात १८७ ठिकाणी घरफोडी तर ५५८ ठिकाणी चोरींच्या घटना घडल्या असून लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. यातील काही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असले तरी अनेक गुन्हे उघड करण्यात पोलिसांचा कस लागत आहे.

टॅग्स :Murderखून