सिंचन अनुशेषग्रस्त विदर्भात ३३ बंधाऱ्यांना मिळाली मंजुरी
By Admin | Updated: August 10, 2014 23:09 IST2014-08-10T23:09:39+5:302014-08-10T23:09:39+5:30
विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत विदर्भात ३३ बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली आहे़ राज्यात सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष असलेल्या पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वाटचाला सहा बंधारे आले

सिंचन अनुशेषग्रस्त विदर्भात ३३ बंधाऱ्यांना मिळाली मंजुरी
सचिन देवतळे - विरूळ (आकाजी)
विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत विदर्भात ३३ बंधाऱ्यांना मंजुरी देण्यात आली आहे़ राज्यात सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष असलेल्या पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वाटचाला सहा बंधारे आले असून, पूर्व विदर्भातील नागपूरला २५ बंधारे देण्यात आले.
जलसंधारण विभागाकडून कोल्हापुरी व साठवण बंधारे बांधण्यात येणार आहे़ केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. विदर्भातील बहूतांश शेती कोरडवाहू आहे़ सिंचनाच्या अभावामुळे बारमाही शेती करणे या भागात शक्य नाही. परिणामी उत्पादन कमी होते़ सिंचनक्षेत्र वाढवावे अशी मागणी सातत्याने होत असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण जलसंधारण विभागाने कायमच ठेवले़ केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार लघु पाटबंधारे योजनांचे मुल्यवर्धन करणे, २५० हेक्टर सिंचन क्षमतेच्या नवीन बंधाऱ्याचे काम हाती घेणे, भूगर्भातील जलाशयाच्या पातळीत वाढ करणे, लघू सिंचन योजनांची स्थानिकांच्या मागणीनुसार दुरूस्ती करणे, शिवकालीन मालगुजारी व कोल्हापुरी बंधाऱ्यांची जलसंचय क्षमता वाढविणे, असे विविध उद्देश आहेत़