शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

३२,३५२ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By admin | Updated: February 7, 2015 23:27 IST

जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्यात आली. ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला.

हवामान पीक विमा : लवकरच रक्कम बॅक खात्यात होणार जमा वर्धा : जिल्ह्यात पहिल्यांदाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्यात आली. ३२ हजार ३५२ शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला. या सर्वच शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मंजूर झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना १६ कोटी १४ लाख ९० हजार रुपये मिळणार असून ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच नुकसानीचा सामना करावा लागला आहे. कधी पावसाची दडी तर कधी अती पाऊस यामुळे शेतातील उभे पीक खराब झाल्याची उदाहरणे आहेत. शासनाच्यावतीने कधी मदत मिळते तर कधी नुकसानीचा भार शेकऱ्यांनाच सहन करावा लागतो. या दृष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी याकरिता कृषी विभागाच्यावतीने हवामान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाल्याचे समोर येत आहे.यंदाच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादकांकरिता हवामान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा नुकताच सर्व्हे झाला असून यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही योजना अंमलात येताच जिल्ह्यातील २१ हजार ४३७ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा विमा उतरविला. या सर्वच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला असून त्यांना १३ कोटी ४१ लाख २२ हजार रुपयांचा लाभ झाला आहे. तर १० हजार ९१५ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा पिका उतरविला. या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानिपोटी त्यांना २ कोटी ७२ लाख ६८ हजार रुपयांची भरपाई संबंधीत कंपनीकडून देण्यात येणार आहे. दोन्ही प्रकारातील किती रक्कम देण्यात येणार याची माहिती मिळाली असून ती नेमकी केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची माहिती मात्र देण्यात आली नाही. रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.(प्रतिनिधी)