३१ ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

By Admin | Updated: June 26, 2015 02:14 IST2015-06-26T02:14:03+5:302015-06-26T02:14:03+5:30

राज्य निवडणूक आयोगाने ३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व ४२ ग्रा.पं. च्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

31gp Announces the general elections | ३१ ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

३१ ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

वर्धा : राज्य निवडणूक आयोगाने ३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व ४२ ग्रा.पं. च्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २५ जुलै रोजी यासाठी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणुका व ४२ ग्रा.पं. च्या पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात मतदान घेण्यात येत असल्याने संबंधित ग्रा.पं. च्या संपूर्ण क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता सोमवार दिनांक २७ जुलै रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहनही अप्पर जिल्हाधिकारी भागवत यांनी केले. वर्धा तालुक्यात सार्वत्रिक साटोणा तर पोटनिवडणूक कुटकी, चिकणी, पुजई, आष्टा, इंझापूर येथे आहे. सेलू तालुक्यात चारमंडळ, हिंगणी, येळाकेळी येथे सार्वत्रिक तर आलगाव, बोंडसुला, आमगाव (ख.), बाभुळगाव, सोंडी, सुकळी (स्टे.), वडगाव (क़) येथे पोटनिवडणूक होईल. देवळी तालुक्यात आकोली, कवठा (रेल्वे), बोरगाव (आ.) येथे सार्वत्रिक तर रोहणी, सोनोरा (ढोक), बाभुळगाव (बो.), सावंगी (येंडे), खातखेडा, लक्ष्मीनारायणपूर, जामणी येथे पोटनिवडणूक आहे. हिंगणघाट तालुक्यात कापसी, हिवरा येथे पोटनिवडणूक, समुद्रपूर तालुक्यात मोहगाव, चिखली, करूर, नारायणपूर, सावंगी (झा.), कोरा, मंगरूळ, हळदगाव, सुजातपूर, हिवरा येथे सार्वत्रिक निवडणूक आहे. आर्वी तालुक्यात हिवरा, बेल्हारा, बोथली, किन्हाळा, वर्धमनेरी, रोहणा, धनोडी (बहा.), बेनोडा येथे सार्वत्रिक व बेढोणा, सावंगी, पानवाडी, काचनूर, आजनगाव, पिंपळगाव (भो.), बोथली (न.), इठलापूर, अहिरवाडा, हुसेनपूर, वाई येथे पोटनिवडणूक आहे. आष्टी येथे पोरगव्हाण, अंतोरा येथे सार्वत्रिक तर खडका, चिस्तूर येथे पोटनिवडणूक होईल. कारंजा तालक्यात पारडी, कन्नमवारग्राम, आजनडोह, नरसिंगपूर, जऊरवाडा येथे सार्वत्रिक तर पालोरा, माळेगाव (काळी), दानापूर, सिंदीविहिरी, खैरवाडा, काजळी, मेटहिरजी, बेलगाव येथे पोटनिवडणूक होणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 31gp Announces the general elections