शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

वर्धा जिल्ह्यात पारध्यांच्या ३० मुलांना दाखविला घरचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:54 IST

वर्धा जिल्हा परिषद शाळेतील पारधी समाजाच्या ३० विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देरोठा येथील झेडपी शाळेतील प्रकार मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्याचा मोठा प्रश्न असताना वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रोठा येथील जिल्हा परिषद शाळेतील पारधी समाजाच्या ३० विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.उमेद संस्थेमार्फत चालविण्यात येणाºया संकल्प प्रकल्पांतर्गत दोन वर्षापूर्वी पारधी समाजातील ३० विद्यार्थ्यांना रोठा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश दिला होता. परंतु यावर्षी या शाळेतील मुख्याध्यापकांनी शाळेत शिक्षक नसल्यामुळे तुमच्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना येथे शिकविता येणार नाही, असे सांगितल्याची माहिती प्रकल्प संचालक मंगेशी मून यांनी लोकमतला दिली. या शाळेत सातवीपर्यंत शिक्षणाची सोय असल्याने ही शाळा निवडण्यात आली होती. सुरुवातीलाही मुख्याध्यापकाने या मुलांना घेण्यास विरोध दर्शविला होता. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करुन व सर्व शिक्षकांच्या समक्ष माहिती देत विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करुन घेतले. विद्यार्थी नियमित शाळेत जाऊ लागल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना दोष देत धाकदपट करणे सुरु केले होते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी प्रकल्प संचालक मंगेशी मून पालकसभेत या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती जाणून घेण्यासाठी गेल्या. तेव्हा सभेतील काही नागरिकांनी मुलांच्या पालकांना समितीत उपस्थितीत राहण्यासाठी विरोध दर्शविला. एप्रिल महिन्यात या सर्व मुलांना भर उन्हात शाळेबाहेर बसविण्यात आले होते. याची माहिती मुलांनी मून यांना दिल्यानंतर मुख्याध्यापकांना विचारले असता तुमच्या प्रकल्पातील मुले ेबदमाशी करतात असे सांगितले.यावर्षी २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी या सर्व मुलांना प्रभातफेरीत सहभागी करुन घेतले. पण, दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी आमच्याकडे तीनच शिक्षक आहे. उद्या जर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना शाळेत येवूनही काहीच आले नाही तर आम्ही जबाबदार नाही. तुम्हाला दुसरी शाळा मिळत असेल तर या विद्यार्थ्यांचे दाखले काढून घ्या, असा सल्ला देत मुख्याध्यापकांनीच पढेगावची एक शाळा सूचवून एका दाखल्याने तीन हजार रुपये तुम्हाला मिळेल, असे सांगितले. त्यामुळे मून यांनी आम्ही मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतो, दाखले विक्रीचा व्यवहार करीत नाही. मुलांच्या भवितव्याकरिता दुसºया शाळेत प्रवेश मिळणार असेल तर लगेच दाखले द्या, असे सांगितले. त्यानंतर रेल्वे कॉलनीतील सरस्वती विद्यालयात चौकशी केली असता तेथील मुख्याध्यापिकेने सर्व मुलांना प्रवेश व सुविधा देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतून मुलांच्या पालकांनी दाखले काढले. त्यानंतर सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिकाने एक शिक्षिका चार महिन्यात सेवानिवृत्त होत आहे, असे सांगून प्रवेश देण्याकरिता हात वर केल्याचाही आरोप मून यांनी केला आहे. त्यामुळे आता ही मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शाळेतील शिक्षिकेला मंगेशी मून यांनी फोन करून प्रकल्पातील ३० मुलांचे दाखले देण्याबाबत सांगितले. मात्र आरटीई कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांचे दाखले देण्यासाठी पालकांच्या स्वाक्षरीने अर्ज करावा लागतो, असे त्यांना सांगितले. त्यांनी लिहिलेल्या अर्जावर पालकांच्या स्वाक्षरी घेऊन दाखले मागितले. त्यामुळे या मुलांचे दाखले देण्यात आले तसेच कुठल्या शाळेत मुलांना प्रवेश देता असे विचारले तेव्हा मूून यांनी सरस्वती विद्यालयासह आणखी एका विद्यालयाचे नाव सांगितले. त्यानंतर मी या शाळेकडे विद्यार्थी दाखल झाले काय याची चौकशी केली. मात्र तेथे विद्यार्थ्यांनींनी प्रवेश घेतलेला नाही असे लक्षात आले. मागील वर्षभर या प्रकल्पातील संचालकांनी शाळेतील सर्वांनाच मनस्ताप दिला. तोही आम्ही सहन केला.- विवेक महाकाळकर, मुख्याध्यापक जि.प. शाळा रोठा.मून यांनी प्रकल्पातील सर्व विद्यार्थ्यांच्या जाण्यायेण्याचा खर्च मागितला होता. त्यामुळे त्यांना एक शिक्षिका सेवानिवृत्त होणार असल्याने हा खर्च झेपावणार नाही, असे सांगितले. तरीही मी या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची तयारी दर्शविली असून त्यासंदर्भात मून यांनाही कळविले आहे.- उज्ज्वला थूल, मुख्यध्यापक, सरस्वती विद्यालय, रेल्वे कॉलनी.

टॅग्स :Schoolशाळा