शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार मातांना मिळाली जननी सुरक्षा

By admin | Updated: February 23, 2017 00:51 IST

ग्रामीण भागासह शहरी भागात संस्थात्मक प्रसुतींना वाव मिळावा यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जननी सुरक्षा

९ लाख ८४ हजार ३०० रुपयांच्या अनुदानाचे वाटप गौरव देशमुख   वर्धा ग्रामीण भागासह शहरी भागात संस्थात्मक प्रसुतींना वाव मिळावा यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांच्या कालावधीत ३ हजार १३६ मातांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ३ हजार १३६ मातांना जननी सुरक्षा योजनेमार्फत ९ लाख ८४ हजार ३०० रूपयांचे अनुदान देण्यात आले. आर्थिक विवंचनेमुळे गरजू कुटुंबातील गरोदर महिलेच्या आरोग्यावरील खर्च त्यांना झेपत नाही. अशा परिस्थितीत प्रसुती दरम्यान किंवा त्यापुर्वी मातेच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ नये म्हणून ही योजना आखण्यात आली. महिलेला योग्य पोषण आहार मिळावा. प्रसुती योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी योनजेतून अनुदान दिले जाते. गरोदर मातांना सुरक्षित प्रसुतीसाठी वेळोवेळी तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येतो. या योजनेतून गरोदर मातेला, गरोदरकाळ आणि प्रसुतीनंतरच्या कालावधीत आपला खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येते. जिल्ह्यात ही योजना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या देखरीखीत राबविण्यात येत आहे. या योजनेतून दोन जिवंत अपत्यापर्यंत लाभ दिला जातो. लाभासाठी मातेचे वय १९ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. वय कमी असल्यास सदर महिला योजनेकरिता अपात्र ठरते. तसेच आरोग्य संस्थेत प्रसुती केल्यावर महिलेला ७०० रूपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येते. महिलेला प्रसुतीसाठी रूग्णालयात नेण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १०८ व १०२ वर संपर्क साधण्याची सुविधा आहे. जिल्ह्यात काही दुर्गम भागात प्रसुतीसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्याने ही प्रसुती घरी होते. माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी ही बाब धोकादायक असते. आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास येथे योग्य काळजी घेतली जाते. अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्यरेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ दिल्या जातो. आगामी काळात शहरी आणि ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांना याचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.