पळसगावात ११ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:09+5:30

घर पडल्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे दिग्रज, मारडा, पळसगाव (बाई) येथील ३२ शालेय विद्यार्थी व ४० नागरिकांना सिंदी रेल्वे येथील नगर विद्यालयाच्या शिक्षकांनी व सरपंच धिरज लेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षीत ठिकाण असलेल्या नगर विद्यालय सिंदी येथे हलविले.

3 houses fall in Palasgaon | पळसगावात ११ घरांची पडझड

पळसगावात ११ घरांची पडझड

Next
ठळक मुद्देशेतपिकांचेही नुकसान । परिसरातील नदी-नाले फुगले

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : परिसरात झालेल्या सततच्या पावसादरम्यान पळसगाव (बाई) येथील ११ घरांची पडझड झाली. शिवाय शेतपिकांनाही त्याचा फटका बसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सदर नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी आहे.
घर पडल्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे दिग्रज, मारडा, पळसगाव (बाई) येथील ३२ शालेय विद्यार्थी व ४० नागरिकांना सिंदी रेल्वे येथील नगर विद्यालयाच्या शिक्षकांनी व सरपंच धिरज लेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षीत ठिकाण असलेल्या नगर विद्यालय सिंदी येथे हलविले. शिवाय त्यांच्या जेणवाचीही व्यवस्था केली होती. १ सप्टेंबरपासून सतत थांबून थांबून मुसळधार पाऊस परिसरात पडत आहे. मुसळधार पावसामुळे पळसगाव (बाई) येथील बंडू झाडे, उमेश खोडके, रामदास देवतळे, मीरा हिंगे, सतीश भगत, भीमराव पाटील, कवडू पाटील, श्रावण शेंडे, दत्तू चिंतावार, नलु बोरकर, वासुदेव तांदुळकर यांच्या घराची पडझड झाली आहे. यात घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती सरपंच धिरज लेंडे यांनी तहसीलदार महेंद्र सोनवणे यांना दिली. त्यानंतर कोतवाल सतीश कुडमती, नारायण वाणी, ग्रा.पं. सदस्य मिना ठमके यांनी नुकसानीची पाहणी केली. तसेच अहवाल तयार करून तो तहसील कार्यालयाला पाठविला आहे. सततच्या पावसामुळे खोलगट भागातील शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शिवाय काही शेतात पाणीच पाणी असल्याने उभे पीक पिवळी पडत आहेत. नाल्याला आलेल्या पुरामुळे दिग्रज, मारडा, पळसगाव (बाई) येथील विद्यार्थी अडकून पडले होते. आपल्या गावी कसे जावे हा त्याच्या समोर प्रश्न होता. त्याची माहिती मिळताच नगर विद्यालय येथील शिक्षकांनी ३२ विध्यार्थी व ४० नागरिकांना शाळेत आणून कपडे दिले. शिवाय त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पुराचे पाणी ओसरल्यावर शाळकरी मुला-मुलींनी गावाचा रस्ता धरला. मदत कार्यात प्रा. गोपाल गवई, चंद्रशेखर डाकोळे, अंबरनाथ नानवतकर, प्रवीण मुळे, पृथ्वीराज दुबे, सरपंच धिरज लेंडे, राहुल गोल्हर, श्रीकांत बुरले आदींनी सहकार्य केले.

Web Title: 3 houses fall in Palasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस