वडनेर येथे २.७९ लाखांची घरफोडी

By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-14T01:19:11+5:302014-06-14T01:19:11+5:30

घरातील कुटुंबीय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याने मागील दारातून प्रवेश करीत सोन्याचे दागिने व रोख ८३ हजार रुपये असा ऐवज लंपास केला.

2.7 lakhs of robberies in Vadnar | वडनेर येथे २.७९ लाखांची घरफोडी

वडनेर येथे २.७९ लाखांची घरफोडी

  वर्धा : घरातील कुटुंबीय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याने मागील दारातून प्रवेश करीत सोन्याचे दागिने व रोख ८३ हजार रुपये असा ऐवज लंपास केला. सदर घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर वडनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथील भाऊराव नासरे यांच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी २ लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़ नासरे कुटुंबिय गाढ झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने असलेल्या लाकडी दाराला छिद्र करून कडी तोडली. घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील ड्रॉवरमधून सोन्याची पोत, पोहेहार २५ ग्रॅम, कुंडले ६ ग्रॅम, गोफ २० ग्रॅम, नथ असे दागिने व सुटकेसमधील नवीन साड्या तसेच ८३ हजार रुपये रुपये पळविले़ नासरे कुटुंबातील सदस्यांना सकाळी जाग आल्यानंतर घराचे दार तुटलेले दिसले़ शिवाय आतील खोलीत साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आले़ यावरून चोरी झाल्याचे निदर्शनात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार केली़ तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३८०, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा वर्धेच्या पथकाला पाचारण करण्यात आले; पण चोरांचा सुगावा लागला नाही़ पूढील तपास सुरू आहे़(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 2.7 lakhs of robberies in Vadnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.