शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

चार व्यक्तींची २.६० लाखांनी फसगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:12 PM

एटीएमचा वापर करणाऱ्या चार जणांची तब्बल २.६० लाखांनी फसगत झाल्याचे पुढे आले आहे. तशी नोंदही पोलिसांनी घेतली आहे. ठगबाज मोठ्या हूशारीने एटीएममधून रोखरक्कम पळवित असल्याने एटीएमचा वापर करणाऱ्यांनी दक्ष राहूनच त्याचा वापर करणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देसावधान : एटीएममधून पळविली जातेय परस्पर रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एटीएमचा वापर करणाऱ्या चार जणांची तब्बल २.६० लाखांनी फसगत झाल्याचे पुढे आले आहे. तशी नोंदही पोलिसांनी घेतली आहे. ठगबाज मोठ्या हूशारीने एटीएममधून रोखरक्कम पळवित असल्याने एटीएमचा वापर करणाऱ्यांनी दक्ष राहूनच त्याचा वापर करणे गरजेचे झाले आहे.वर्धा शहर व सेवाग्राम येथील रहिवासी असलेल्यांच्या एटीएममधून कुणी तरी अज्ञात आरोपीने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर रोकड पळविण्याचे पुढे आले आहे. तशा तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. २५ डिसेंबरला विनोद डोमाजी देवढे यांची परस्पर रक्कम काढून १ लाख ६० हजारांनी फसवणूक झाल्याची तक्रार वर्धा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तर शेख इमरान शेख गूलाब रा. त्रिमुर्तीनगर वर्धा यांना देखील ठगबाजांनी ६६ हजारांनी चूना लावला आहे.या दोन्ही प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून आणखी दोघांची एकूण ३४ हजारांनी फसवणूक झाल्याचेही पुढे आले आहे. या दोन्ही प्रकरणाची पोलीस सध्या चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या या चारही व्यक्तींना कुठल्याही प्रकारची खोटी बतावणी करणारा फोन आला नाही. त्यामुळे सदर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांचीही दमछाक होत असून लवकरच आरोपीला जेरबंद करू असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.पिन टाकताना त्यावर हाताने कव्हर करावेस्कीमर व एटीएम क्लोनिंग एटीएम मशीन सध्याच्या विज्ञान युकातील नागरिकांसाठी नवीन नाही; पण स्कीमर हा नवीन प्रकार असू शकतो. स्कीमर हे एक छोटेसे यंत्र आहे. जे जिथे ए.टी.एम. मशीनमध्ये ए.टी.एम. कार्ड टाकतो तेथे ठगबाजांकडून लावण्यात येते. ते यंत्र दिसायला एकदम ए.टी.एम. मशीनच्या स्लॉट सारखे असल्याने ते सहसा लक्षात येत नाही. शिवाय सामान्य नागरीकांनी अशा स्कीमर लावलेल्या ए.टी.एम. मशीन मधून व्यवहार केल्यास त्यांचे कार्डची संपूर्ण माहिती त्यामध्ये सेव्ह होते. असे गुन्हे करणारे आरोपी त्या माहितीपासून दुसरे (क्लोन) एटीएम कार्ड बनवून त्याचा वापर रक्कमेची चोरी करण्याकरिता करतात. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. एटीएम पीन इंसर्ट करताना त्यावर दुसऱ्या हाताने कव्हर करावे. शिवाय कुणाचीही अशा प्रकारे फसगत झाल्यास त्याने सायबर पो.स्टे.कडे तक्रार द्यावी, असे पोलिसांच्यावतीने कळविण्यात आले आहे.रोख काढल्यानंतर उडवतात रक्कमदैनंदीन कामाकरिता एटीएम कक्षातून रोख काढण्यात आली. परंतु, त्यानंतर अवघ्या काही तासातच एटीएम धारकाच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम पळविण्यात आली. इतकेच नव्हे तर ठगबाजांकडून रक्कम काढताना भूवनेश्वर (ओरीसा), गया (बिहार), यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील काही एटीएमचा वापर झाल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. याबाबत सायबर पो.स्टे.कडून पाठपूरावा करण्यात येत आहे व लवकरच या प्रकरणांचा छडा लावण्यात यश येईल असा विश्वास तेथील पोलीस अधिकारी व कर्मचारी व्यक्त करीत आहेत.स्कीमर व एटीएम क्लोनिंगचा वापरनागरिकांच्या बँक खात्यातून रक्कम पळविण्यासाठी नवनवी युक्तीच लढविली जात आहे. अशातच स्कीमर व एटीएम क्लोनिंगचाही ठगबाजांकडून वापर होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहूनच एटीएमद्वारे आर्थिक व्यवहार करणे गरजेचे आहे.