२६ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत
By Admin | Updated: December 13, 2014 02:16 IST2014-12-13T02:16:02+5:302014-12-13T02:16:02+5:30
मोरांगणा परिक्षेत्रातील एकूण ५ तलाठी साजातील २८ गावांपैकी २६ गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत निघाली़ यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना...

२६ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत
खरांगणा (मो़) : मोरांगणा परिक्षेत्रातील एकूण ५ तलाठी साजातील २८ गावांपैकी २६ गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत निघाली़ यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले़
अत्यल्प पावसामुळे परिसरातील मुख्य पेरा असलेले सोयाबीन हातचे गेले़ एकरी २० ते ६० किलोपर्यंतच ज्वारीच्या दाण्यासारख्या सोयाबीनचा उतारा आला़ कपाशीवरही लाल्या व करपा रोग आल्याने खर्च भरून निघाण्याइतकेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येताना दिसत नाही़ सर्कलमधील बरीच गावे डोंगराळ भागात आहे़ कोरडवाहू शेतीचे प्रमाणही अधिक आहे़ शेतीवर खर्चच अधिक प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ मंडळ निरीक्षकांच्या देखरेखीत प्रत्येक तलाठी साजात टाकण्यात आलेल्या प्लॉटमधील उत्पन्नावर आधारित काढलेली पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे़ सर्कलमध्ये २८ गावे समाविष्ट आहेत़ पैकी महाकाळी धरणात गेल्याने व खापरी रिठ असल्याने आणेवारीत समायोजित झाली नाही़
२६ गावांमध्ये मोरांगणा ४५ पैसे, पाणवाडी ५०, भादोड ४८, बोथली नटाळा ४५ पैसे, कासारखेडा ४९, तळेगाव रघुजी ४६, काचनुर ४३, दहेगाव गोंडी ४५, सहेली ४७, मदना ४७, सालई मजरा ४७, सावद ४६, खरांगणा ४९, पाटण ४१, नान्ही ४३, वानरकुंड ४२, विटपूर ४६, बोरखेडी ४६, ठेका सावद ४४, माळेगाव काळी ४६, ब्राह्मणवाडा ४१ याप्रमाणे आणेवारी असल्याची माहिती महसूल मंडळ निरीक्षक धकाते व तलाठी कांबळे यांनी जाहीर केली़(वार्ताहर)