शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

घाटांची 25 टक्के रक्कम कमी; आयुक्तांकडून प्रस्तावाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2022 5:00 AM

जिल्ह्यात नवीन वाळू निर्गती धोरणानुसार ३९ घाट लिलावाकरिता पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी ३६ घाटांकरिता लिलाव प्रक्रिया घेतली असता पहिल्या फेरीमध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ आणि हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रिठ व ढिवरी (पिपरी) या चार घाटांचा लिलाव झाला.  त्यानंतर ३२ घाटांकरिता दुसरी फेरी घेतली असता त्यात समुद्रपूर तालुक्यातील चाकूर आणि शिवणी या दोनच घाटांचा लिलाव झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लिलावाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतरही ३० घाटांचा लिलाव न झाल्याने जिल्हा खनिकर्म विभागाकडून या घाटांची किंमत २५ टक्के करुन देण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला होता. विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, आता येत्या दोन आठवड्यांमध्ये उर्वरित ३० वाळू घाटांची २५ टक्के रक्कम कमी करुन लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.जिल्ह्यात नवीन वाळू निर्गती धोरणानुसार ३९ घाट लिलावाकरिता पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी ३६ घाटांकरिता लिलाव प्रक्रिया घेतली असता पहिल्या फेरीमध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ आणि हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रिठ व ढिवरी (पिपरी) या चार घाटांचा लिलाव झाला.  त्यानंतर ३२ घाटांकरिता दुसरी फेरी घेतली असता त्यात समुद्रपूर तालुक्यातील चाकूर आणि शिवणी या दोनच घाटांचा लिलाव झाला. त्यानंतरही ३० घाटांकरिता तिसरी फेरी घेतली, पण एकही घाट लिलाव झाला नाही. अखेर या ३० घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून देण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला. त्यांनी मंजुरी दिली असून, या ३० घाटांचा कमी किमतीमध्ये लिलाव होणार असून, किती घाटधारक सहभागी होतात, हे येणारी वेळच सांगणार.

तिघांंची रक्कम शासन जमा, पुन्हा होणार पूर्ण किमतीत लिलाव-    लिलावाच्या पहिल्या फेरीमध्ये सालफळ, उमरा-औरंगपूर रिठ, सावंगी रिठ व ढिवरी (पिपरी) या चार घाटांचा लिलाव झाला. दुसऱ्या फेरीमध्ये चाकूर आणि शिवणी या दोन घाटांचा लिलाव झाला. लिलावधारकाला लिलावादरम्यान २५ टक्के अनामत रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर महिन्याभरात घाटांची पूर्ण रक्कम शासन जमा करून ताबा घ्यावा लागतो. या सहा घाटधारकांपैकी सावंगी रिठ, ढिवरी (पिपरी) व सालफळ या घाटधारकांनी रक्कम भरलीच नाही. त्यांना १५ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली होती. तरीही रक्कम भरण्याकडे पाठ फिरविल्याने या तिन्ही घाटांची अनामत रक्कम शासन जमा करण्यात आली. ही रक्कम जवळपास ५८ ते ६० लाखांच्या घरात आहे. आता या तिन्ही घाटांचा पूर्ण किमतीमध्ये लिलाव होणार आहे.

नवीन धोरण लागू होण्याची शक्यता कमीच? -    जिल्ह्यालगतच्या अमरावती, नागपूर व यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शासनाच्या नवीन धोरणानुसार वाळूची  रॉयल्टी ६०० रुपये आहे. असे असतानाही वर्धा जिल्ह्यातील रॉयल्टी ४ हजार १६७ रुपये प्रतिब्रास आहे. पण, हे धोरण वर्ध्यात लागू होण्याकरिता सध्या तरी विलंब होण्याची चिन्ह दिसत आहे. कारण शासकीय नियमानुसार पहिल्या लिलावानंतर दुसरी व तिसरी लिलाव फेरी घेऊनही घाट लिलाव झाले नाही तर त्या घाटांच्या किमती २५ टक्के कमी करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून मंजुरी घेतली जाते. त्यांच्या मंजुरीनंतर पुन्हा लिलावप्रक्रिया राबवून तीनदा लिलाव घ्यावा लागतो. त्यानंतरही लिलावात गेले नाही, तर मग लगतच्या जिल्ह्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. पण, तोपर्यंत पावसाळा लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील ३६ वाळू घाटांकरिता लिलावप्रक्रिया राबविण्यात आली होती. यादरम्यान सहा घाटांचा लिलाव झाला असून, ३० घाटांचा फेरलिलाव घेण्यात आला. तिसऱ्या फेरीनंतरही घाटांचा लिलाव न झाल्याने नियमानुसार ३० घाटांची रक्कम २५ टक्के कमी करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, आता लवकरच लिलावप्रक्रिया राबविली जाईल. डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :sandवाळू