३१ पैकी २५ जलाशये फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:37+5:30

वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे अकरा जलाशये आहेत. त्यापैकी धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प तसेच सुकळी लघु प्रकल्प सध्या १०० टक्के भरला आहे. तर बोर प्रकल्पात ५७.५२ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ८६.११ टक्के, मदन प्रकल्पात ७२.४७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

25 of 31 dam full | ३१ पैकी २५ जलाशये फुल्ल

३१ पैकी २५ जलाशये फुल्ल

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरड्या दुष्काळाचे विघ्न बाप्पाने केले दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात भीषण जलसंकटाच्या झळा वर्ध्यातील नागरिकांना सहन कराव्या लागल्या. शिवाय, पावसाळ्याच्या सुरुवातीला वेळोवेळी पाऊस दडी मारत राहिल्याने जिल्ह्यात यंदा पाणी पेटणार असेच चित्र निर्माण झाले होते; पण त्यानंतर परिस्थिती बदली. गणरायाच्या आगमनापूर्वी आणि स्थापनेनंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने वर्धा जिल्ह्यातील ३१ पैकी २५ जलाशये पूर्णपणे भरली आहेत. एकूणच विघ्नहर्त्या श्रीगणेशाने वर्धा जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे विघ्न दूर केल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे अकरा जलाशये आहेत. त्यापैकी धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प तसेच सुकळी लघु प्रकल्प सध्या १०० टक्के भरला आहे. तर बोर प्रकल्पात ५७.५२ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ८६.११ टक्के, मदन प्रकल्पात ७२.४७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. एकूणच जिल्ह्यातील मोठे व मध्यम जलाशयात सद्यस्थितीत ८३.९८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर जिल्ह्यात एकूण २० लघु जलाशये आहेत. त्यापैकी कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, आजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुºहा, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हराशी हे जलाशय १०० टक्के भरले आहेत. तसेच टाकळी बोरखेडी जलाशयात ७६.२४ टक्के, रोठा-१ जलाशयात ६२.७२ टक्के, टेंभरी जलाशयात ५४.९० टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची जलसंकटातून सुटका होईल, असे बोलले जात आहे.

Web Title: 25 of 31 dam full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण