पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाला लागताहेत २४ वर्षे
By Admin | Updated: August 10, 2014 23:11 IST2014-08-10T23:11:08+5:302014-08-10T23:11:08+5:30
गत २४ वर्षांपूर्वी साहूरच्या मंजूळा (जाम) नदीला आलेल्या महापूरात ३६ पुरग्रस्तांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी साहूरला भेट दिली होती़ यातील

पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाला लागताहेत २४ वर्षे
वर्धा : गत २४ वर्षांपूर्वी साहूरच्या मंजूळा (जाम) नदीला आलेल्या महापूरात ३६ पुरग्रस्तांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी साहूरला भेट दिली होती़ यातील पुरग्रस्तांचे मात्र अद्यापही पुनर्वसन करण्यात आले नाही़ याकडे लक्ष देत त्वरित त्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मानव जोडो संघटनने केली आहे़
साहूर येथील ३६ पुरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी अनेक निवेदने देण्यात आली़ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, आंदोलने केली; पण अद्यापही कारवाई झाली नाही़ राज्यात अनेक ठिकाणच्या पुरग्रस्तांना सुधारित घरे बांधून देत आर्थिक मदत करण्यात आली; पण साहूरच्या पुरग्रस्तांवर अन्यायच करण्यात आला आहे़ याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर संबंधितांना पुरग्रस्तांना कोंडवाडा, नाल्या, रस्ते, शाळा, ग्रामपंचायत भवन बांधून दिल्याचे सांगितले जाते़ मग, कोंडवाड्यात, शाळेत वा ग्रा़पं़ भवनात पुरग्रस्तांनी राहावे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ पुरग्रस्तांना भूखंडाचे योग्य पट्टे द्यावे, घरे बांधण्यासाठी २ लाख व भूमिहीनांना १ लाख ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी वा प्रत्येकाला सुधारित घरकुले बांधून द्यावीत, अशी मागणी मानव जोडोने केली आहे़ निवेदनाच्या प्रती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री म़रा़ मुंबई, मदत व पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री, खा़ रामदास तडस, तहसीलदार आष्टी (श़) व लोकप्रतिनिधींनाही सादर करण्यात आल्या आहेत़(कार्यालय प्रतिनिधी)