शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम मशीन फोडून ‘सिनेस्टाईल’ पळविली २३.७८ लाखांची रोकड; घटना सीसीटीव्हीत कैद

By चैतन्य जोशी | Updated: August 29, 2022 16:44 IST

वायगाव येथील घटनेने खळबळ; बोरगावातही झाला एटीएम फोडण्याचा प्रयत्न

वर्धा : एटीएममध्ये प्रवेश करुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा समोरील भाग कापून तब्बल २३ लाख ७८ हजार ८०० रुपयांची रोकड चोरट्यांनी सिनेस्टाईल पळविली. ही घटना वायगाव (नि.) येथील बाजार चौकात २८ रोजी मध्यरात्री १.३० ते २.३० वाजताच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे काही तासांपूर्वी वर्धा नजीकच्या बोरगावातही एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न फसला.

बोलेरो वाहनाने अज्ञात चोरटे वायगाव येथे पोहचले. मध्यरात्रीच्या सुमारास बाजार चौकात असलेल्या एसबीआय कंपनीच्या एटीएममध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील २३ लाख ७८ हजार ८०० रुपयांची रोकड चोरुन सिनेस्टाईल पळ काढला.

हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी वायगाव गाठून घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी देवळी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांचे १० पथक चोरट्यांच्या शोधात...

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अशी तब्बल १० पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली आहे. महामार्गावर नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. चोरटे पुलगावमार्गे अमरावती जिल्ह्यात पसार झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएमtheftचोरीMONEYपैसा