शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बचत खात्यातून २२ हजार लंपास

By admin | Updated: June 8, 2014 00:04 IST

बँकेतून बोलतो असे सांगत एटीएमचा कोड माहिती करून येथील विलास नत्थूजी नक्षीणे यांच्या सेलू येथील स्टेट बँकेतून बचत खात्यातून २२ हजार रुपयांची परस्पर उचल झाल्याची घटना घडली.

घोराड :  बँकेतून बोलतो असे सांगत एटीएमचा कोड माहिती करून येथील विलास नत्थूजी नक्षीणे यांच्या सेलू येथील स्टेट बँकेतून बचत  खात्यातून २२ हजार रुपयांची परस्पर उचल झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, २८ मे रोजी विलासला  स्टेट बँक ऑफ इंडियामधून बोलत आहे., तुमचा एटीएमचा कोड लॉक झाला आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन कोड देण्यात येत आहे. कृपया आपला कोड सांगावा, या आशयाचे बोलणे करणारा भ्रमणध्वनी आला. यावर विश्‍वास ठेवत विलासने एटीएमचा कोड सांगितला. विलास ६ जूनला त्याच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेला असता रक्कम मिळत नव्हती. या बचत खात्यात पैसे नसल्याचे दर्शवित असल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी मिळविलेल्या तपशील नुसार २८ मे, २९ मे व २ जूनला या बचत खात्यातून एकूण २२ हजार रुपयांची उचल केल्याचे कळले. हे पैसे कुणी काढले असावे, असा विचार केल्यानंतर त्यांना मोबाईलवर कोड नंबर विचारल्याचे लक्षात आले. त्यांनी सेलू पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मात्र त्याला आलेला भ्रमणध्वनी क्रमांक लक्षात नसल्याने तपासाला गती आली नाही.(वार्ताहर)