हरियाणाच्या सोनीपतवरून रवाना झाले २१ विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:11+5:30
जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील नवव्या वर्गातील ११ विद्यार्थी आणि दहा विद्यार्थिनी नॅशनल इंटीग्रीटी कार्यक्रमांतर्गत मायग्रेशन स्किम मध्ये हरियाणा राज्यातील जवाहर विद्यालय बुटाना जि. सोनीपत येथे जून महिन्यात एक वर्षासाठी गेले होते. ते परत येणारच तेव्हा कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. अशातच हे २१ विद्यार्थी हरियाणा राज्यात अडकले.

हरियाणाच्या सोनीपतवरून रवाना झाले २१ विद्यार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिक्षण घेणारे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हरियाणा राज्यातील सोनीपत येथे अडकलेले २१ विद्यार्थी वर्धेच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच ते वर्धा जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील नवव्या वर्गातील ११ विद्यार्थी आणि दहा विद्यार्थिनी नॅशनल इंटीग्रीटी कार्यक्रमांतर्गत मायग्रेशन स्किम मध्ये हरियाणा राज्यातील जवाहर विद्यालय बुटाना जि. सोनीपत येथे जून महिन्यात एक वर्षासाठी गेले होते. ते परत येणारच तेव्हा कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. अशातच हे २१ विद्यार्थी हरियाणा राज्यात अडकले. त्याची घर वापसी व्हावी अशी मागणी पालकांनी खा. रामदास तडस यांच्याकडे केली. त्यानंतर खा. तडस यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय गृह राज्यमंत्री रेड्डी यांच्याशी संपर्क करून योग्य कार्यवाहीची विनंती केली. त्यानंतर सदर २१ विद्यार्थ्यांना मुळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे विद्यार्थी शनिवार २ मे रोजी बुटाना सोनीपत येथून एका ट्रॅव्हल्सने वर्ध्यासाठी रवाना झाले आहेत. रविवारी ते सेलूकाटेच्या नवोदय विद्यालयात पोहोचणार आहेत.
रविवारी सेलूकाटे येथे पोहोचणार
जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथील नवव्या वर्गात शिकणारा उदय घुटे, प्रज्वल मैदापवार, प्रतिक डेहनकर, विनय पाटील, विवके चरडे, वेदांत निम्बेकर, देवांग काळे, संकेत तेलंग, अनुज सातपूते, गौरव गवळी, साहील परतेकी, श्रृतिका लोखंडे, समिक्षा किनकर, खुशी लाजुरकर, सुहानी द्रुगवार, भाविका शेंडे, अनुश्री इंदूरकर, आर्या मतले, करिना सराटे, मयुरी कंगाले, स्नेहा आत्राम व कला शिक्षक सुनील चांदूरकर, लता मानकर, चांदूरकर तसेच बस चालक प्रमोद कुमार व ग्यानेद्र हे रविवारी वर्ध्यात दाखल होणार आहेत.