जिल्ह्याला १८ हजार मेट्रिक टन धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:12+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान्याच्या तुटवड्यामुळे कोणालाही अडचण जाणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

18000 metric tonnes of grain to the district | जिल्ह्याला १८ हजार मेट्रिक टन धान्य

जिल्ह्याला १८ हजार मेट्रिक टन धान्य

Next
ठळक मुद्देवाहतुकीला सुरुवात : तीन महिन्यांच्या नियतनाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनामुळे गोरगरिबांना तीन महिन्यांचे धान्य नियतन एकाच वेळी मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मागणी केली होती. जिल्ह्याला तीन महिन्यांसाठी जवळपास १८ हजार मेट्रिक टन धान्य नियतन मंजूर झाले आहेत. येत्या एक एप्रिलपासून संबंधीत दुकानदारांना तीन महिन्यांचे नियतन धान्य देण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान्याच्या तुटवड्यामुळे कोणालाही अडचण जाणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. जिल्ह्याला तीन महिन्यांचे नियोजन एकाच वेळी मंजूर करण्यात आले आहे. शासनाकडून पुरवठाही सुरू झाला आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीसाठी अधिक वाहने लावून दुकानापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था पुरवठा विभागामार्फत करण्यात आली आहे.
दररोजचे नियतन ४०० ते ४५० मेट्रिक टन धान्याची उचल होत आहे. यात बहुतांश गहू आणि तांदूळ याचा समावेश आहे. लॉकडाउन असल्याने एकाच वेळी तीन महिन्यांचे जवळपास १८ हजार मेट्रिक टन धान्य मंजूर करण्यात आले आहे. दुकानदारांनी एकाच वेळी धान्य पुरवठा करताना दोन ग्रहकांमधील अंतर एक मीटर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही लाभार्थ्यांचे थम घ्यायचे नाहीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुकानदारांनी आपल्या आयडीवरून पावती द्यावी लागणार आहे. धान्य खरेदीसाठी आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, त्यासाठी सॅनिटायझर, मास्कची व्यवस्था संबंधित ठिकाणी करावी लागणार आहे.

दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन धान्याची उचल होत आहे. सध्या दीड महिना पुरेल ऐवढे ४ हजार ९६७ मेट्रिक टन नियतन धान्य शिल्लक आहे. येत्या १ एप्रिलपासून संबंधित दुकानदारांना नियतन तीन महिन्यांचे धान्य देण्यात येणार आहे.
रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

Web Title: 18000 metric tonnes of grain to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.