शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

तलवारीने मारून १.८० लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:20 IST

गुरूकृपा कॉटन जिनिंगमध्ये भरदुपारी चार युवक हातात तलवारी फिरवीत रोखपालाच्या कक्षात शिरले.

ठळक मुद्देरोखपालासह दोघे जखमी : कांढळीच्या गुरूकृपा कॉटन जिनमधील घटना

ऑनलाईन लोकमतसमुद्रपूर : गुरूकृपा कॉटन जिनिंगमध्ये भरदुपारी चार युवक हातात तलवारी फिरवीत रोखपालाच्या कक्षात शिरले. त्याच्या पायावर तलवारीने वार करीत टेबलच्या कप्प्यातील १ लाख ८० हजार रुपये घेऊन बाहेर पडले. काट्याजवळ उभ्या असलेल्या एका कर्मचाºयाच्या हातावर वार केला व कारमधून पळून गेले. शनिवारी दुपारी १२.३० वाजता पडलेल्या थरारक सिनेस्टाईल दरोड्याने दहशत निर्माण झाली होती.नागपूर-चंद्रपूर महामार्ग क्र. ७ वरील कानकाटी कांढळी येथे सौरभ अग्रवाल व विशाल वजानी यांच्या मालकीचा गुरूकृपा कॉटन जीन आहे. शनिवारी तेथे फार वर्दळ नव्हती. दोन मालवाहू आॅटो कापूस खाली करीत होते तर मजरा येथील शेतकरी भास्कर कोहचाडे हा रोखपालाच्या रूममध्ये ५ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स घेत होता. यावेळी रोखपाल बलराम साहू (५८) व शेतकरी दोघेच तेथे होते. दुसºया बाजूने काटा असून तेथे आतमध्ये घनश्याम चांदेकर व महेश्वर फुलवानी होते. गणेश धाबर्डे हा बाहेर काट्यावर उभा होता. दरम्यान, कारमधून चौघे हातात तलवारी घेऊन आत आले. कार बाहेरच उभी होती. ते तलवारी फिरवीत थेट रोखपालाच्या कक्षाकडे गेले. तलवारीचे वार तेथील खुर्च्या तोडल्या. रोखपाल बलराम साहू याच्या हातावर वार करीत टेबलच्या कप्प्यात असलेले १ लाख ८० हजार रुपये कप्प्यासह घेतली. शेतकरी भास्कर कोहचाडे यांनी ५ हजार रुपये घेतले होते. त्याच्या गालावर तलवार लावत ती रक्कम हिसकावून घेतली.यातील एक व्यक्ती तलवार घेऊन काट्याकडे गेला व गणेश धाबर्डेच्या पायावर वार केला. मापारी घनश्याम चांदेकर, महेश्वर फुलवानी यांना बाहेर न येण्याची ताकीद दिली. दरम्यान, कार आत आली व चौघांनीही तेथून पळ काढला. कारला समोर व मागे पिवळ्या रंगाची नंबर नसलेली प्लेट होती. तक्रारीनंतर ठाणेदार प्रवीण मुंडे उपराष्ट्रपतीच्या दौºयात बंदोबस्तात असल्याने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लिगांडे, माधुरी गायकवाडसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. तपास पोलीस करीत आहेत. समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिंमत चतूर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा