१८ लाखांचा रेडा ठरला आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:31 PM2019-01-05T21:31:49+5:302019-01-05T21:32:34+5:30

कृषी महोत्सवात पशुप्रदर्शनीही आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीत अमरावती जिल्ह्यातील तळेगाव (द.) येथील दादाजी मुटकरे यांच्या मालकीचा रेडा पशुपालकांसह शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.

18 lakhs are the attraction of attraction | १८ लाखांचा रेडा ठरला आकर्षण

१८ लाखांचा रेडा ठरला आकर्षण

Next
ठळक मुद्देसहा लाखांत झाली मागणी : मालकाला मिळवून देतो रोज ५ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कृषी महोत्सवात पशुप्रदर्शनीही आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीत अमरावती जिल्ह्यातील तळेगाव (द.) येथील दादाजी मुटकरे यांच्या मालकीचा रेडा पशुपालकांसह शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे. विशेष म्हणजे या रेड्याला विकत घेण्यासाठी ६ लाखांची मागणी झाली असून मुटकरे यांनी त्याची किंमत १८ लाख रुपये ठेवली आहे.
पशुपालक दादाजी मुटकरे यांच्याकडे सध्या ७३ जनावरे असून त्यात ४० म्हशी आणि ३३ गार्इंचा समावेश आहे. पशुपालक मुटकरे यांनी सदर रेड्याला चांगली खिलाई-पिलाई देत घरीच धष्टपुष्ट असा तयार केला आहे.
त्याला दररोज १० किलो जवसाची ढेप, पाच लिटर दुध व १२ अंडी दिली जातात. शिवाय हिरवा चाराही त्याला दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे या रेड्याच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाला कमीत कमी पाच म्हशीचे नैसर्गिकरित्या रेतन केल्या जाते. यातून पशुपालक मुटकरे यांना प्रत्येक दिवशी पाच हजार रुपये मिळत असल्याचे पशुपालक मुटकरे यांनी सांगितले. सरकारने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा मुटकरे यांना आहे.
५० हजारांचा बोकड प्रदर्शनात
सिंदी रेल्वे येथील शेळी पालक भानुदास ठाकरे यांनी प्रदर्शनीत आणलेला बोकड शेतकºयांसह पशुपालकांसाठी आकर्षण ठरत आहे. त्यांनी या बोकडाची किंमत ५० हजार रुपये ठेवली असून त्यांनी तो ४० हजारात खरेदी केला होता. इतकेच नव्हे तर शेळीपालक ठाकरे यांच्याकडे सध्या एकूण १५० शेळ्या असून त्यात जमनापारी, तोतापुरी, नागफनी, काटेवाडी, बिरल व गावरानी क्रॉस प्रजातीच्या बकºया असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 18 lakhs are the attraction of attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.