स्वस्त धान्यासाठी ग्रामस्थांना १६ किमीची पायपीट
By Admin | Updated: February 25, 2015 02:08 IST2015-02-25T02:08:56+5:302015-02-25T02:08:56+5:30
समुद्रपूर तालुक्यातील मेंढुला येथे स्वस्त धान्य दुकानाची चौकशी दोन वर्षांपासून अपूर्ण आहे़ यामुळे मेंढूला येथील ग्रामस्थांना केवळ...

स्वस्त धान्यासाठी ग्रामस्थांना १६ किमीची पायपीट
नारायणपूर : समुद्रपूर तालुक्यातील मेंढुला येथे स्वस्त धान्य दुकानाची चौकशी दोन वर्षांपासून अपूर्ण आहे़ यामुळे मेंढूला येथील ग्रामस्थांना केवळ शिधापत्रिकेवरील धान्यासाठी १६ किमी ये-जा करावी लागते़ त्यातही धान्य उपलब्ध नसल्यास रित्या हाताने परत यावे लागते़ यामुळे मेंढूला येथील स्वस्त धान्य दुकान सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे़
मेंढुला येथील स्वस्त धान्य दुकान पुरवठा विभागाने चौकशीकरिता काही दिवसांसाठी बंद केले़ नंदोरी येथील स्वस्त धान्य दुकानातून मेंढुला येथील ग्रामस्थांना धान्य दिले जाते; पण दोन वर्षांचा काळ लोटला असताना मेंढुला येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी पूर्ण झाली नाही़ यामुळे ग्रामस्थांना स्वस्त धान्यासाठी १० ते १५ किमी पायपीट करावी लागत आहे. कधी धान्य साठा उपलब्ध नसल्यास ग्रामस्थांना रित्या हाताने परत यावे लागते़ समुद्रपूर पुरवठा विभागाने लाभार्थ्यांना धान्य मिळवून देण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)