१६३ टपाल मते अवैध
By Admin | Updated: May 17, 2014 00:25 IST2014-05-17T00:25:09+5:302014-05-17T00:25:09+5:30
वर्धा लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यावेळी आलेल्या १४0३ मतांमधून १६३ टपालीमते अवैद्य ठरली.

१६३ टपाल मते अवैध
प्रफुल्ल लुंगे - वर्धा वर्धा लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यावेळी आलेल्या १४0३ मतांमधून १६३ टपालीमते अवैद्य ठरली. यामुळे सुशिक्षीत म्हणवून घेणार्या अधिकारी-कर्मचार्यांच्या सुशिक्षीत पणावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. टपाल मतपत्रिकांमध्ये बहुजन सामजपार्टीचे चेतन पेंदाम यांना ७४, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सागर मेघे यांना ४0५, भाजपाचे रामदास तडस यांना ७४0 मते मिळाली. आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे श्रीकृष्ण उबाळे यांना ११ समाजवादी पार्टीचे डॉ. अंकुश नवले यांना सात बहुजन मुक्ती पार्टीचे किशोर किनकर यांना दोन, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेरंद मेश्राम एक, आपचे मो. अलीम पटेल मो.वहीद यांना १९, अरविंद लिल्लोरे, जगदीश कडू, विलास तडस, दिपकसिंह देशमुख, जयदीप देशमख, शुन्य, मनिष तेलरांधे, रवी येळणे, जगन्नाथ राऊत, राजेंद्र शंभरकर व सचिन राऊत यांना शुन्य तर अपक्ष भास्कर नेवारे एक, शामबाबा निचीत एक, संजय चिडाम एक तर नोटावर (कुणालाही नाही) पाच मते पडली. टपाली मतदारांची १६३ एवढी मते अवैद्य होणे हे सुशिक्षीत मतदारांसाठी धक्कादायक बाब आहे. यांच्यापासून अशिक्षीत मतदारांनी काय बोध घ्यावा हा प्रश्न आहे. काही निवडणुकीत अनेक मतदारांचे भवितव्य टपाली मतांवरही अवलंबून असते. एवढी काट्याची टक्कर होते. अशावेळी या मतदारांची जर मते एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अवैद्य झाली तर निकालाचे चित्र पालटते. स्वत:ला सुशिक्षीत म्हणवून घेणार्या मतदारांना शासकीय नोकरीत असताना आपला महत्वपूर्ण मतदानचा अधिकारही योग्यपणे बजावता येत नसेल तर यांच्यापेक्षा अशिक्षीत मतदार बरा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. निवडणुकींचे प्रशिक्षण देतांना अशा कर्मचार्यांना स्वत:चे मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण सर्वप्रथम देण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या जडणघडणीत एक-एक मत देशाचे भवितव्य घडवू शकते, अशी घशाला कोरड येतपर्यंत सांगणारी यंत्रणा व मतदानापासून कुणाही वंचीत राहू नये यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत असताना खुद्द शासकीय अधिकारी-कर्मचारीच मतदानाच्या महत्त्वपूर्ण हक्काबद्दल किती बेफीकर आहे, याचा प्रत्यय येतो.