शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणाने दिला १६ हजार मनुष्य दिवस रोजगार

By admin | Updated: July 28, 2014 23:41 IST

पर्यावरण संरक्षणार्थ हरितम्, शतकोटी वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांतून कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात लाखो रोपांची लागवड करण्यात आली़ यापैकी किती झाडे जगली, हा अभ्यासाचा विषय आहे़

हजारो वृक्ष जिवंत : सात ते आठ फुटांपर्यंत वाढलीत झाडेकिरण उपाध्ये - पुलगावपर्यावरण संरक्षणार्थ हरितम्, शतकोटी वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांतून कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात लाखो रोपांची लागवड करण्यात आली़ यापैकी किती झाडे जगली, हा अभ्यासाचा विषय आहे़ देवळी तालुक्यात मात्र सामाजिक वनीकरण विभागाने गत दोन वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या वृक्षारोपणाने सरासरी १६ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून दिला़ वनिकरणने १२ हजार वृक्षांचे रोपण केले आहे़ सामाजिक वनीकरण विभागात काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची कमतरता आहे़ सेवानिवृत्त वा बदली झालेल्या रिक्त पदावर नवीन कर्मचारी नियुक्त झाले नाहीत़ इत:पर मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर वनिकरण विभाग सामाजिक बांधिलकीचे काम पार पाडत आहे़ देवळी तालुक्यातील १५ शाळांतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व विविध उपक्रमांचे प्रशिक्षण, प्रगतीचा लेखाजोखा ठेवणे, वृक्षदिंडी, नाल्यांवर बंधारे बांधणे, स्वच्छता अभियान, रंगपंचमी होळीला पर्यावरणपूरक व रसायनविरहित रंग वापरणे, सर्पमैत्री, सहल, प्रदूषणविरहित फटाके फोडणे, चित्रकला, वादविवाद, निबंध स्पर्धांचे आयोजन, शेतकऱ्यांना साग, बांबू, वृक्ष लागवडीबद्दल सातत्याने प्रबोधन करणे आदी कामे करीत आहे़ त्यातच शतकोटी उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाने शासकीय, निमशासकीय कार्यालय, नझुल, महसूल, संस्था, शाळांच्या पडित जमिनीचे सर्वेक्षण करून त्यांच्या अखत्यारितील जागेवर वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले होते; पण अद्याप ३३ टक्के भूप्रदेश वनाच्छादीत झाल्याचे दिसत नाही़महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक वनिकरण विभागाचे वर्धा जिल्हा उपसंचालक बडगे यांच्या मार्गदर्शनात दोन वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड व संगोपण करून ग्रामीण लोकांना रोजगार दिला आहे़ यात २०१२ मध्ये रत्नापूर-अडेगाव या ४ मिकी अंतरावर २ हजार, २०१३ मध्ये विजयगोपाल-इंझाळा, भिडी-बाभुळगाव मार्गावर ३ हजार झाडे, दिघी-देवळी-वायगाव रोडवर १ हजार झाडे, २०१४ मध्ये कोळोणा (घो़) - विजयगोपाल, रोहिणी-शिरपूर-वाटखेडा ते अडेगाव मार्गाच्या दुतर्फा विविध प्रजातींची ६ हजार रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे़ शिवाय या वर्षी मनरेगा अंतर्गत गुंजखेडा येथे १५ हजार रोपांची रोपवाटिका सुरू करण्यात आली आहे़ या रोपवाटिकेवर अंदाजे १ लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे़ यातून आतापर्यंत १६ हजार मनुष्य दिवस रोजगार दिला आहे़ ही सर्व झाडे जिवंत असून ५ ते ७ फुट उंचीची झाली आहेत़