सूक्ष्म सिंचनसाठी १५० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:48 IST2017-09-08T00:45:41+5:302017-09-08T00:48:24+5:30
वर्धा नदीवरील निम्न वर्धा धरणाचे काम पुर्णत्त्वास येत आहे. या प्रकल्पाकरिता आर्वी तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील काही भाग असे मिळून एकूण २८ गावातील जमिनीचे संपादन करण्यात आले होते.

सूक्ष्म सिंचनसाठी १५० कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : वर्धा नदीवरील निम्न वर्धा धरणाचे काम पुर्णत्त्वास येत आहे. या प्रकल्पाकरिता आर्वी तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील काही भाग असे मिळून एकूण २८ गावातील जमिनीचे संपादन करण्यात आले होते. या धरणाकरिता परिसरातील शेतकºयांच्या जमिनीसह घरेसुद्धा बाधीत झालेली आहेत. या शेतकºयांच्या समस्या मार्गी लावण्याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी २०१० पासून प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नाला आता यश आले असून प्रकल्प पूर्णत्त्वास येण्याकरिता १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री झाले त्या काळापासून विदर्भात अनेक योजना अस्तित्त्वात आल्या. यात तालुक्यातील शेतकºयांच्या फायद्यासाठी २६४.४७ कोटी रुपयांची पथदर्शी सूक्ष्म सिंचन योजना मंजूर केली. या निधीपैकी १५० कोटी निधी निर्गमित झाले आहे. निम्म वर्धा प्रकल्प हा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याकरिता तसेच या योजनेची माहिती देण्याकरिता २०१६ मध्ये निम्न वर्धा धरणावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: बैठक घेतली होती.
या प्रकल्पाकरिता मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनी सहकार्य केले. कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यात या सुक्ष्म सिंचनामुळे हरितक्रांती घडेल अशी अपेक्षा शासनाच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे.
राबविण्यात येणाºया योजनेची वैशिष्टे
- या योजनेमुळे ४० गावातील ८,४०० हेक्टर जमिनीवर सिंचनाची सोय होणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश निम्म वर्धा प्रकल्पाच्या जलाशयातून २४.०३ द.ल घ.मी. इतके पाणी प्रस्तावित धनोडी येथील पंपगृहातून उचलून आर्वी तालुक्यातील ८४०० हेक्टर क्षेत्रात बंदिस्त नलिकेतुन व सूक्ष्म सिंचनाकरिता सोडण्यात येत आहे. यात प्रत्येकी १ हेक्टर क्षेत्रापर्यंत सूक्ष्म सिंचन पद्धतीने सिंचनाचे प्रयोजन करण्यात आले आहे. सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून ७५ टक्के ठिबक प्रणाली व २५ टक्के भागात तुषार सिंचन देण्याचे प्रयोजन आहे. या योजनेसाठी ३३ केव्ही क्षमतेचे विद्युत सब स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहे.
- पाणी वापर तसेच शेतकी प्रशिक्षण देण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकामही यात होणार आहे. बांधकाम परिसरातील अंतर्गत रस्ते, दर्शक फलक, रस्ते, रेल्वे ओलांडणे इत्यादी किरकोळ कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पाणी वापर संस्था स्थापन करून घनमापन पद्धतीने पाणी वितरण करण्याचा प्रस्ताव आहे.