अपघातात १३ पोलीस जखमी
By Admin | Updated: April 28, 2015 01:48 IST2015-04-28T01:48:40+5:302015-04-28T01:48:40+5:30
निवडणूक बंदोबस्ताकरिता गडचिरोली येथे जात असलेल्या वर्धा पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. यात १३ पोलीस

अपघातात १३ पोलीस जखमी
गडचिरोलीतील ग्रा.पं. निवडणूक : बंदोबस्तात जाणारी पोलीस व्हॅन उलटली
वर्धा : निवडणूक बंदोबस्ताकरिता गडचिरोली येथे जात असलेल्या वर्धा पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. यात १३ पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना करंजी (भोगे) येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. जखमी पोलिसांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या अपघातात वर्धा ठाण्याचे प्रकाश पंचशिरी लोखंडे, जितेंद्र गाडवे, प्रेमदेव घनश्याम सरोदे, पुलगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रूपचंद भगत, रवी बालखेडे, जसपाल सूर्यवंशी, समुद्रपूर ठाण्याचे शेखर नेहारे, राजेश थुल, धनंजय पांडे, अनिल, मारोती पिचड, सुभाष शेंडे व हिंगणघाट ठाण्याचे विनायक खेकडे हे जखमी झाले.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथील नक्षल भागात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काही अनुचित प्रकार होवू नये, याकरिता शासनाच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
या बंदोबस्ताकरिता वर्धा येथील पोलीस कर्मचारी पोलिसांच्या एम एच ३२ जे २१३ क्रमांकाच्या वाहनाने जात असताना त्याच्या वाहनाला अचानक करंजी (भोगे) येथे अपघात झाला. या अपघातात एकूण १३ कर्मचारी जखमी झाले. घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसात करण्यात आली असून जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)