शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

१.१८ लाख बालकांना पोलिओची लस

By admin | Updated: January 8, 2016 02:43 IST

जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यात एकूण १ लाख १७ हजार ७७६ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.

आशुतोष सलिल : पोलिओ लसीकरणाविषयी समाजात जागृती करावर्धा : जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यात एकूण १ लाख १७ हजार ७७६ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यात १ हजार ३३७ केंद्रात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात १ हजार १३८ व शहरी भागात ११९ केंद्रे असून ३२६७ कर्मचारी व २६७ पर्यवेक्षक नेमण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोएिशनचे अभिषेक वोरा, सुहास इंगळे, डॉ. आशीष वर्मा, आर.पी. साठोणे, पडोळे, रोटरी क्लबचे राहुल सराफ, महेश पोद्दार, एन.पी. वानखेडे, अल्ताफ, जामा मशिदीचे सचिव सय्यद आसिफ अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते. १७ जानेवारी व २१ फेब्रुवारीला होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक वंचित राहणार नाही. याकरिता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, बस व रेल्वेस्थानक, इतर सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात यावे. बसगाड्यामध्ये स्टिकर्स लावण्यात यावे, दूरदर्शन व केबलवरून जाहिरात करण्यात यावी, रेडीओ एमगिरीवरून जाहिरात करण्यात यावी, मशिदीवरून माईकिंग अशा विविध माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी मोहिमेकरिता आखलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.(प्रतिनिधी)