लॅन्को चोरीप्रकरणात ११ जण अटकेत
By Admin | Updated: August 17, 2014 23:19 IST2014-08-17T23:19:18+5:302014-08-17T23:19:18+5:30
मांडवा येथील लॅन्को कंपनीत दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. सुरक्षा रक्षकांच्या संपकाळात झालेल्या चोरीत आठ एलसीडी व तीन फ्रिज चोरट्यांनी लंपास केले होते. त्याची एकूण किंमत

लॅन्को चोरीप्रकरणात ११ जण अटकेत
आकोली : मांडवा येथील लॅन्को कंपनीत दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. सुरक्षा रक्षकांच्या संपकाळात झालेल्या चोरीत आठ एलसीडी व तीन फ्रिज चोरट्यांनी लंपास केले होते. त्याची एकूण किंमत ७८ हजार रुपये होती. सदर चोरीप्रकरणी खरांगणा पोलिसात गुन्हा दाखल होता. यात आतापर्यंत पोलिसांनी अकरा आरोपींना अटक केली असून चोरीतील फ्रिज व एलसीडी जप्त करण्यात आला असून इतर मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.
लॅन्को कंपनीत सात एलसीडी व तीन फ्रिजची चोरी झाल्याची तक्रार २५ जून रोजी खरांगणा (मोरांगणा) पोलिसात करण्यात आली होती. या चोरीच्या तपासात मात्र तत्कालीन ठाणेदारांनी तपासता रूची दाखवली नाही. येथे नवे ठाणेदार म्हणून प्रशांत पांडे रूजू होताच त्यांचे लक्ष चोरीप्रकरणाकडे वळले. त्यांनी तत्काळ सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार वसंत इंगोले व त्यांच्या चमूकडे देवून तपास सुरू केला. तपासाचे धागेदोरे हाती लागताच पोलिसांनी संशयावरून आरोपींची चौकशी केली. यात आतापर्यंत या गुन्ह्यात अकरा जणांना अटक करण्यात आली आहे.
सदर चोरी प्रकरणी पोलिसांनी एक एककरिता दत्तु चिंतामण बोबडे रा. तिनखेडा, ता. सौंसर, जि. छिंदवाडा, अंकुश वाल्मीक भोंडवे, नारायण रामाजी आत्राम, धनराज मसराम, लोवेश झामरे, प्रमोद भांडवे, आकाश केंडे, देवराज बंसोड, वैभव पारीसे, सुदेश केंडे, नारायण वाघाडे यांना अटक केली. या आरोपींना पोलिसी हिसका दाखवून बोलते केले असता त्यांनी चोरीची कबुली दिली. यातील नारायण आत्राम याने पुलई येथील घरात लपवुन ठेवलेला फ्रिज व एलसीडी खरांगणा पोलिसांनी जप्त केला.
चोरीतील काही वस्तु नागपुरात विकल्याची माहिती पुढे आल्याने आरोपींना नागपूर येथे नेण्यात येणार आहे. यात सहा एलसीडी व दोन फ्रिज जप्त करणे बाकी असून आरोपींची पोलीस कोठडी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ठाणेदार प्रशांत पांडे यांंच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार वसंत इंगोले, पोलीस नायक गजानन दरणे, रवी जुगनाके तपास करीत आहे.(वार्ताहर)