लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध दारुविक्री व निर्मितीवर वॉच ठेवला आहे. यादरम्यान आलोडी शिवारात गावठी दारूभट्टी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच धाड घालून गावठी दारूसाठ्यासह २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विजय ताराचंद शेंडे रा.नागसेननगर हा घटनास्थळावरून पसार झाला.विजय ताराचंद शेंडे रा. नागसेननगर आलोडी हा शिवारातील मुधोळकर लॉनच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यावर गावठी दारुची भट्टी काढतो, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता तेथे २२ लोखंडी ड्रममध्ये अंदाजे ४ हजार ४०० लिटर मोहा सडवा रसायन, ४ भट्टी ड्रम व इतर साहित्य असा एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विजय घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, मनीष श्रीवास, गोल्हर, वाघमारे यांनी केली.
आलोडी शिवारात गावठी दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST
विजय ताराचंद शेंडे रा. नागसेननगर आलोडी हा शिवारातील मुधोळकर लॉनच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यावर गावठी दारुची भट्टी काढतो, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
आलोडी शिवारात गावठी दारूभट्टीवर धाड
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त