शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:22 IST

Uttarakhand Crime News: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सव्वा दोन लाखांच्या बनावट नोटांसह मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सव्वा दोन लाखांच्या बनावट नोटांसह मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.  पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी यूट्युबवर बनावट नोटा तयार करण्याचे व्हिडीओ पाहिले आणि काम सुरू केले, असे सांगितले. आरोपी देहराडून येथील सुद्धोवाला आणि डून एनक्लेव, पटेलनगर येथे भाड्याच्या खोलीत राहून बनाावट नोटांचा धंदा चालवत होते. 

हरिद्वार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौरभ, निखिल कुमार, अनंतबीर, नीरज, मोहित आणि विशाल अशी आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी हे उत्तर प्रदेशमधील राहणारे आहेत. सहारनपूर जिल्ह्यामधील देवबंद येथील गांधी कॉलनीमध्ये राहणारा सौरभ हा त्याच्या गावातील विशाल आणि नीरज या सख्ख्या भावांना ओळखत होता. ते देहराडूनला राहायचे.  नीरज पाचवी नापास होता. तर विशाल हा आठवीत नापास झालेला होता. मात्र दोघेही डोक्याने चालाख होते. त्यांची गाठ पाडून घेण्यासाठी सौरभ हासुद्धा देहराडूनला आला होता. दोन्ही भावांची लाईफस्टाईल पाहून तो खूप प्रभावित झाला होता. खरंतर हे दोघेही भाऊ बनावट नोटांच्या धंद्यात गुंतलेले होते. 

दरम्यान, हरिद्वारचे एसएसपी प्रमेंद डोभाल यांनी सांगितले की, विशालने सौरभ ची ओळख सहारनपूर येथील सरसावा येथील रहिवासी असलेल्या मोहित याच्यासोबत करून दिली. मोहित हा १२वी पास झालेला होता. तोसुद्धा देहराडूनमधील सुद्धोवाला येथे भाड्याच्या घरात राहत होता. तिथून तो बनावट नोटांचा धंदा चालवत होता. या धंद्यात होणारा लाभ पाहून सौरभसुद्धा त्यांच्या टोळीत घुसला. मोहितनंतर सौरभची ओळख सरसावा येथील निखिल कुमार याच्याशी झाली. दरम्यान, एका चांगल्या कंपनीत गार्डची नोकरी करून मिळणाऱ्या पगारातून शौक भागत नसल्याने निखिलने ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापून श्रीमंत होण्याचा शॉर्टकड मार्ग अवलंबला. तसेच संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड बनला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

बनावट नोटांप्रकरणी निखिल आणि मोहित यांना हिमाचल प्रदेश पोलिसांनी २०२१ मध्ये अटक केली होती. एसएसपी  प्रमेंद डोभाल यांनी पुढे सांगितले की, सौरभ, निखिल आणि अनंतवीर हे बाजारात नकली नोटा चालवायचे. ते गर्दीच्या ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये तसेच वृद्ध दुकानदारांच्या दुकानामधून नोटा चालवण्याचं राम करायचे. दरम्यान, हे लोक देहराडून येथून हरिद्वार येथे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून सव्वा दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर, लॅपटॉप, आयफोन यासह नकली नोटा बनवण्याशी संबंधित इतर सामान जप्त करण्यात आलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttarakhandउत्तराखंड