शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी

By योगेश पांडे | Updated: February 19, 2025 23:11 IST

असंख्य भाविकांना त्रिवेणी संगमाशी जोडणारा दुवा, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी नियमित कामांना मारली दांडी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, प्रयागराज: येथे सुरू असलेल्या महाकुंभाचा अखेरचा टप्पा सुरू असूनदेखील दररोज सरासरी कोटींहून अधिक भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी देशभरातून येत आहेत. यंदाचा महाकुंभ आस्था व श्रद्धा यांचे दर्शन दाखविणारा ठरला असला तरी स्थानिकांनी निरनिराळ्या माध्यमांतून यातून अर्थकारणदेखील साधले आहे. विशेषत: प्रचंड वाहतूककोंडीमुळे मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश बंद असल्याने कोट्यवधी भाविकांसाठी स्थानिक मोटारसायकलस्वार तरुण हेच सारथी झाले आहेत. अनेकांनी महिन्याभरात यातून लाखो रुपयांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे पवित्र संगमावर जाण्यासाठी नाव चालविणाऱ्या नावाड्यांनादेखील अच्छे दिन आल्याचे चित्र आहे.

‘लोकमत’ने प्रयागराजमधील एकूण वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली असता बहुतांश भाविक हे सरासरी १५ ते २० किलोमीटर पायीच चालत असल्याचे दिसून आले. महाशिवरात्रीच्या अगोदर काहीही करून पवित्र स्नान व्हावे यासाठी मिळेल त्या साधनाने भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर पवित्र संगम व विविध आखाड्यांवर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्थाच नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी मोठी अडचण होत आहे. मात्र त्यांच्यासाठी स्थानिक मोटारसायकलस्वार तरुण सारथी झाले आहेत. एकीकडे भाविकांची सेवा व दुसरीकडे अर्थलाभ असे दुहेरी गणित या तरुणांकडून साधले जात आहे. सर्वसाधारणत: पार्किंग तसेच रेल्वेस्थानकापासून कुंभाच्या प्रवेशद्वारापर्यंत किंवा प्रवेशद्वारापासून विविध घाटांपर्यंत विविध टप्प्यांमध्ये हे मोटारसायकलस्वार दिसून येत आहेत. एका व्यक्तीकडून चारशे ते हजार रुपये भाडे आकारण्यात येत आहे. यातून दिवसभरात सहजपणे एक मोटारसायकलस्वार तीन ते चार हजार रुपये कमावत असल्याचे वास्तव आहे.

भाविकांची सोय, पोलिसांचे अभय

या बाइक टॅक्सीला शासनाची कुठलीही मान्यता नाही. मात्र भाविकांची सोय होत असल्याने आमच्याकडून फारशी कारवाई होत नसल्याचे सहायक पोलिस आयुक्त एस. एस. परिहार यांनी सांगितले. बहुतांश मोटारसायकलस्वार एकाच वेळी दोन भाविकांना बाइकवर नेत आहेत. मात्र एकूण स्थिती पाहता पोलिसांकडूनदेखील त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळण्यात येत आहे.

नौकेचे सारथ्य करण्यासाठी हजारो नावाडी

दरम्यान, विविध घाटांपासून पवित्र संगमापर्यंत आत जाण्यासाठी भाविकांकडून नाव व मोटारबोट्सचा वापर करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत प्रयागराजमध्ये सुमारे पाच हजार बोट संचालित होत आहेत. त्या चालविण्यासाठी प्रयागराजसोबत उत्तर प्रदेश व बिहारमधूनदेखील अनेक नावाडी आल्याची माहिती स्थानिक बोटचालक धर्मेंद्र प्रेमचंद याने दिली.

बोटिंगचे दर दहापट वाढले, गंगेतही ट्रॅफिक जॅम

महाकुंभ प्रशासनाकडून बोटिंगसाठी ४५ रुपये ते १२५ रुपये इतके दर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र कोट्यवधी भाविकांची गर्दी लक्षात घेता नावाडी व बोट कंत्राटदारांकडून तब्बल दहा पटींहून अधिक दर आकारण्यात येत आहेत. ‘लोकमत’ने याची शहानिशा केली व एका व्यक्तीकडून १३०० ते १६०० रुपये घेण्यात येत असल्याची बाब समोर आली. यातील ३० टक्के रक्कम कंत्राटदाराला जात असून उर्वरित रक्कम नावाडी वाटून घेत आहेत. एका बोटीत एका वेळेला जवळपास १० भाविक बसत असून या तुलनेत दिवसाला दोन ‘ट्रीप’देखील त्यांना मोठा फायदा करवून देत असल्याची माहिती स्थानिक कंत्राटदार धर्मेंद्र प्रेमचंदने दिली.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराज