शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुण, तरुणी आणि जोडपी, फ्लॅटमधून येत होते अजब आवाज, आतलं दृश्य पाहून पोलीसही अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 15:57 IST

Rave Party in NOIDA: सोसायटीमधील रहिवाशांनी पोलिसांना फोन करून एका फ्लॅटमधून चित्रविचित्र आवाज येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस त्वरित सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडून आतील परिस्थिती पाहिली, तेव्हा तेसुद्धा अवाक झाले.

नोएडामधील सेक्टर ९४ मधील पॉश परिसरात असलेल्या सुपरनोव्हा सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई केली. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी जेव्हा फ्लॅटमध्ये प्रवेश केला तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी या फ्लॅटमधून २० हून अधिक तरुण तरुणींना अटक केली. 

मिळालेल्या माहितीनुसार सोसायटीमधील रहिवाशांनी पोलिसांना फोन करून एका फ्लॅटमधून चित्रविचित्र आवाज येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस त्वरित सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यांनी दरवाजा उघडून आतील परिस्थिती पाहिली, तेव्हा तेसुद्धा अवाक झाले. फ्लॅटमध्ये काही विद्यार्थी विद्यार्थिनी बेधुंद होऊन मद्यपान करत होते. फ्लॅटमध्ये चहुबाजूला दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. पकडण्यात आलेल्या अनेक तरुण तरुणींचं वय हे २१ वर्षांहून कमी असल्याची माहिती समोर येत आहे. 

ताब्यात घेण्यात आलेल्या तरुण तरुणींनी दिलेल्या माहितीमधून येथे शुक्रवारी रात्री विद्यार्थ्यांनी रेव्ह पार्टीचं आयोजन केलं होतं. सुपरनोव्हा सोसायटीमधील रहिवाशांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी या विद्यार्थी तरुण तरुणींना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी रहिवाशांसोबत गैरवर्तन केलं. काहींनी बाल्कनीमधून दारूच्या बाटल्यासुद्धा खाली फेकल्या.यादरम्यान,  तिथे मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती. अखेर त्रस्त झालेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलीस तिथे आले. पोलिसांना दरवाजा उघडून आत पाहिलं असता तिथे काही तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत सापडले.

पोलिसांनी या कारवाईनंतर सांगितले की, या रेव्ह पार्टीचं निमंत्रण हे व्हॉट्सअँपवरून पाठवण्यात आलं होतं. त्यात लिहिलं होतं की, एक धमाकेदार हाऊस पार्टी होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता घरी या. निमंत्रणासोबत प्रवेश फीसुद्धा नमुद करण्यात आली होती. त्यामध्ये मुलींसाठी ५०० रुपये, कपल्ससाठी ८०० रुपये आणि तरुणांसाठी १ हजार रुपये असा दर ठेवण्यात आला होता. आता या प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश