शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

योगी आदित्यनाथ वित्तमंत्र्यांसोबत खेळले बॅडमिंटन, खेळातील कौशल्य पाहून सारेच झाले अवाक्  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:12 AM

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशमधील बरेली येथे योगी आदित्यनाथ यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. योगी आदित्यनाथ हे येथे डोरी लाल स्पोर्ट्स स्टेडियममधील मल्टिपर्पज हॉलचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. यादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॅडमिंटन कोर्टामध्ये पोहोचले.

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे योगी आदित्यनाथ यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. योगी आदित्यनाथ हे येथे डोरी लाल स्पोर्ट्स स्टेडियममधील मल्टिपर्पज हॉलचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. यादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॅडमिंटन कोर्टामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी उत्तर प्रदेशच्या वित्तमंत्र्यांना खेळायला बोलावले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री काही काळ बॅडमिंटनच्या कोर्टवर  खेळाचा आनंद घेतला.

एकीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हातात रॅकेट होतं. तर दुसरीकडे वित्तमंत्री सुरेश खन्ना हेही सज्ज होऊन खेळत होते. भगवी कफनी घालून खेळत असलेल्या योगी यांना खेळताना पाहून सारेच अवाक् झाले होते. तसेच मुख्यमंत्री स्वत: खेळात हात आजमावत असताना तिथे खेळाडू, नेतेमंडळी आणि सुरक्षा अधिकारी आदी उपस्थित होते.  या उद्घाटन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्टेडियममध्ये उपस्थित असलेले खेळाडू प्रशिक्षक आदींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच स्टेडियममध्ये खेळांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोईसुविधांचंही निरीक्षण केलं.

डोरी लाल स्पोर्ट्स स्टेडियममध्ये बनवण्यात आलेल्या आधुनिक हॉलमध्ये १० कोटी ८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा संपूर्ण हॉल एअर कंडिशन आहे. यामध्ये दोन बाल्कनी बनवण्यात आल्या आहेत. तसेच या हॉलमध्ये एकाचवेळी ३५० लोकांच्या राहण्याची सुविधा आहे.  तसेच खेळाडूंना थांबण्यासाठी विश्रामगृह, ट्रेकिंग रूम, मेडिकल रूम यासह लिफ्ट आदींची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या हॉलमध्ये कुस्ती, टेबल टेनिस, कबड्डी, बॅडमिंटन आदी खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBadmintonBadmintonUttar Pradeshउत्तर प्रदेश