शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथ यांची डिमांड वाढली, 25 दिवसांत 67 हून अधिक रॅली आणि रोड शो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 12:42 IST

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशमध्ये 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे स्टार प्रचारक विविध मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली घेत आहेत. दरम्यान, भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारासाठी मागणी खूप वाढली आहे. हे त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या रॅली आणि रोड शो यावरून दिसून येते. 

उत्तर प्रदेशमध्ये 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. परंतु, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 दिवसांत संपूर्ण राज्यात 67 हून अधिक रॅली, रोड शो आणि प्रबोधन परिषद घेऊन उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. दुसऱ्या टप्प्यात योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील आठही जागांवर अनेक रॅली, रोड शो घेऊन जनतेशी अधिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

इतर 6 राज्यातही प्रचार भाजपाकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत इतर 6 राज्यांमध्येही भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रचार केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा येथे प्रचार सभा घेऊन आपला निवडणूक प्रवास सुरू केला होता, तर दुसऱ्या टप्प्यात हनुमान जयंतीच्या दिवशी 'श्री राम'चा शेवटचा कार्यक्रम रोड शो होता.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत महाराष्ट्र, जम्मू, उत्तराखंड, राजस्थान, बिहार आणि छत्तीसगडमध्ये सभा घेतल्या आहेत. यापैकी छत्तीसगडमधील राजनांदगाव, महाराष्ट्रातील वर्धा, राजस्थानमधील जोधपूर, राजसमंद, चित्तौडगड आणि बारमेर या जागांवर 26 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

मथुरेतून निवडणूक प्रचाराला सुरुवातमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 27 मार्चपासून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची कमान सोपवण्याचे आवाहन सुरू केले होते. योगी आदित्यनाथ यांनी  27 मार्च रोजी मथुरेत पहिली प्रचार सभा घेतली होती. येथून योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांच्यासाठी प्रचार करत लोकांशी संवाद साधला, तर मेरठमधील भाजपा उमेदवार अरुण गोविल यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचा प्रचार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

लोकदलाच्या उमेदवारासाठीही जोरदार प्रचार बागपत मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाजपाचे सत्यपाल सिंह आहेत. यावेळी युतीमुळे ही जागा लोकदलाकडे गेली. लोकदलाचे उमेदवार डॉ.राजकुमार सांगवान येथून निवडणूक लढवत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी अनेकवेळा भाजपाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला, तर राजकुमार सांगवान यांच्यासाठी रात्रंदिवस प्रचार केला. 

उत्तर प्रदेशातील 8 जागांवर उद्या मतदानउत्तर प्रदेशातील ज्या आठ जागांवर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये यंदाच्या निवडणुकीत भाजपाने गाझियाबाद आणि मेरठमध्ये नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. सध्या व्हीके सिंह गाझियाबादचे खासदार आहेत आणि राजेंद्र अग्रवाल मेरठचे खासदार आहेत. भाजपाने गाझियाबादमधून आमदार अतुल गर्ग यांना उमेदवारी दिली असून अरुण गोविल हे मेरठमधून उमेदवार आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा