शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बहराइच हिंसाचारातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालणार? प्रशासनाने चिकटवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 21:20 IST

Bahraich Violence: हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सरफराज, मोहम्मद तालीम, अब्दुल हमीद, फहीम आणि मोहम्मद अफजल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Bahraich Violence News:उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासन आता कडक कारवाईच्या मूडमद्ये असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराजगंज परिसरात बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरे आणि दुकानांवर नोटिसा चिकटवल्या आहेत. यामध्ये राम गोपाल हत्याकांडातील मुख्य आरोपी अब्दुलच्या घराचाही समावेश आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसमध्ये दुकान आणि घरमालकांकडून उत्तरे मागितली आहेत. बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्यास कारवाई केली जाईल, असे विभागाने म्हटले. महसी महाराजगंजमधील डझनभर घरे आणि दुकानांची ओळख पटली असून त्यावर नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत.

बहराइच सार्वजनिक बांधकाम विभागाने आरोपी अब्दुल हमीदच्या घरावर चिकटवलेल्या नोटीसमध्ये कुंदसर महसी नानपारा मुख्य जिल्हा मार्गावरील महाराजगंजच्या काठावर बेकायदेशीर बांधकामाचा उल्लेख करण्यात आला आहे. कुंदसर महसी नानपारा रस्ता हा प्रमुख जिल्हा मार्ग श्रेणीतील रस्ता आहे. विभागीय मानकांनुसार, प्रमुख जिल्हा मार्गावरील ग्रामीण भागातील रस्त्याच्या मध्यभागापासून 60 फूट अंतरावर विभागीय परवानगीशिवाय केलेले कोणतेही बांधकाम बेकायदेशीर बांधकामाच्या श्रेणीत येते.

सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला नोटीसद्वारे कळविण्यात येते की, तुम्ही जर हे बांधकाम जिल्हादंडाधिकारी, बहराइच यांच्या परवानगीने केले असेल, तर त्याची मूळ प्रत तात्काळ उपलब्ध करून द्यावी अन्यथा अवैध बांधकाम स्वतः काढून घ्यावे. मुदत संपल्यानंतर पोलीस व प्रशासनाच्या मदतीने बेकायदा बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात येईल व कारवाईत झालेला खर्च तुमच्याकडून वसूल केला जाईल.

आतापर्यंत 60 जणांना अटक बहराइचमधील हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले पाच आरोपी सरफराज, मोहम्मद तालीम, अब्दुल हमीद, फहीम आणि मोहम्मद अफजल यांना शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बहराइच हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 60 जणांना अटक केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथCrime Newsगुन्हेगारी