शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

बदललेला उमेदवार अडचणीचा ठरणार? जितीन प्रसाद यांना इतिहास घडविण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 7:56 AM

नेपाळ आणि उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेला पिलीभीत लोकसभा मतदारसंघ सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

ललित झांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क पिलीभीत : नेपाळ आणि उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेला पिलीभीत लोकसभा मतदारसंघ सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलाय.  एरवी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो; पण यावेळी भाजपसाठी पिलीभीतची लढत वाटते तेवढी सोपी नाही कारण भाजपने विद्यमान खासदार वरुण गांधी यांच्या ऐवजी जितीन प्रसाद यांना रिंगणात उतरवले आहे. वरुण हे  दोन वेळा तर मनेका गांधी ह्या पिलीभीतच्या सहा वेळा खासदार राहिल्या आहेत. मात्र  त्यांच्याऐवजी वेगळाच चेहरा दिल्याने भाजपासाठी ही लढत सोपी नसेल.

 याची कल्पना आहे म्हणूनच १० वर्षांत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पिलीभीत येथे प्रचारसभा घेतली. त्या सभेला गांधी मायलेक उपस्थित नव्हते.  पिलीभीत येथे समाजवादी पार्टीने जातीच्या समीकरणांना डोळ्यासमोर ठेवून भगवतशरण गंगवार यांना मैदानात उतरवले आहे. तेसुद्धा बाहेरच्या जिल्ह्यांतील म्हणजे बरेलीतील नवाबगंजचे आहेत. त्यांचे जातीचे कार्ड निष्प्रभ ठरविण्यासाठी भाजपाकडून संजय गंगवार हे राज्यमंत्री जोमाने प्रचारात उतरले आहे. बहुजन समाज पार्टीने साधारण २६ टक्के मुस्लीम मतदार बघता अनिस अहमद यांना उमेदवारी दिली आहे.  या मतदारसंघात ४.५ लाख मुस्लीम, ३.५ लाख लोधी, २.७५ लाख अनुसूचित जातीचे आणि साधारण अडीच लाख कूर्मी मतदार आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  1. १९९६ नंतर प्रथमच येथे मनेका गांधी किंवा वरुण गांधी उमेदवार नाही.  या मायलेकांशी पिलीभीतच्या नागरिकांचे वेगळेच भावनिक नाते आहे. त्याला यावेळी धक्का पोहोचलेला आहे. 
  2. जितीन प्रसाद हे योगी सरकारमध्ये मंत्री असले तरी आधी ते काँग्रेसमध्ये होते. ते मूळ भाजपावासी नाहीत, पिलीभीतचेही नाहीत, तर शेजारच्या शहाजहाँपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे स्थानिकांना ते बाहेरचेच वाटतात.
  3. बहुजन समाज पार्टीचे अनिस अहमद हे मुस्लीम मतदारांचे किती मते खेचतात, त्यावर राजकीय समीकरण अवलंबून असेल. येेथे २६ टक्के मुस्लीम मतदार आहेत. 

एकूण मतदार    १७,३०,६२८

  • पुरुष - ९,३४,७३७
  • महिला - ७,९५,८२५

२०१९ मध्ये काय घडले?वरुण गांधी भाजप ७,०४,५४९ (विजयी)हेमराज वर्मा समाजवादी पार्टी ४,४८,९२२ 

२०१९ पूर्वी कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     २०१४        मनेका गांधी     भाजप    ५४६९३४२००९    वरुण गांधी     भाजप    ४१९५३९२००४    मनेका गांधी    भाजप    २५५६१५१९९९    मनेका गांधी    अपक्ष    ४३३४२११९९८    मनेका गांधी    अपक्ष    ३९०३८१

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४