शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तिच्यासाठी कायपण... चालण्यावरुन संशय, ग्रामस्थांनी बुरखा फाडला अन् निघाला युवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 15:27 IST

ग्रामस्थांनी बुरखाधारी युवकाला पकडून जबर मारहाण केली. तसेच, पोलिसांनाही घटनास्थळी बोलावले.

शहाजहाँपूर - कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी महिलांना असलेल्या मोफत बससेवेचा लाभ घेण्यासाठी एका पुरुषाने बुरखा परिधान करुन बसमधून प्रवास केला होता. मात्र, त्याच्या संशयित हालचालीवरुन त्याचा भांडाफोड झाल्याची बातमी चांगलीच व्हायरल झाली होती. आता, उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील जलालाबाद क्षेत्रातील एका युवकाने प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क बुरखा घालून तिच्या गावात प्रवेश केला. मात्र, त्याच्या चालण्यावरुन संशय आल्याने ग्रामस्थांनी त्याचा बुरखा फाडला असता ती नसून तो असल्याचे समोर आले. 

ग्रामस्थांनी बुरखाधारी युवकाला पकडून जबर मारहाण केली. तसेच, पोलिसांनाही घटनास्थळी बोलावले. त्यानंतर, चौकशीअंती प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. जलालाबाद येथील या युवकाचे त्याच्या नातलगात असलेल्या तरुणीवर प्रेम होते. जी तरुणी जवळील गावातच राहत होती. त्यामुळे, शनिवारी तो युवक बुरखा परिधान करुन तिच्या गावात पोहोचला. मात्र, गावकऱ्यांनी त्याच्या संशयित हालचालीवरुन त्याला पकडले, बुरख्यात युवक असल्याने गावातील इतरही मंडळी एकत्र आली व, त्यांनी तरुणाला मारहाण केली. 

दरम्यान, यावेळी आपणास मारहाण न करण्याची विनंती करत युवकाने हात जोडले. मात्र, काहींना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तसेच, ह्या युवकाने सर्व प्रेमकहाणीही ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला ताब्यात घेतले. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही, पण पोलिसांकडून युवकाची चौकशी सुरू आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल