शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024: श्रीरामाच्या अयोध्येतच भाजपा पिछाडीवर, कमळ कोमेजले, सपाची सायकल सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 11:48 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. एवढंच नाही तर भाजपाने फारमोठा गाजावाजा केलेल्या अयोध्येमध्येही भाजपाला फार मोठा धक्का बसताना दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. एवढंच नाही तर भाजपाने फारमोठा गाजावाजा केलेल्या अयोध्येमध्येही भाजपाला फार मोठा धक्का बसताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार अयोध्या ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येते तिथे भाजपाचे उमेदवार लल्लू सिंह हे ६२२३ मतांनी पिछाडीवर पडले आहेत. तेथे समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी आघाडी घेतली आहे. 

फैजाबाद लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांना १ लाख १८ हजार ९५५ मतं मिळाली आहेत. तर भाजपाच्या लल्लू सिंह यांना १ लाख १३ हजार १६८ मतं मिळाली आहेत.  दरम्यान, उत्तर प्रदेशमधून समोर आलेल्या आतापर्यंतच्या कलांनुसार उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी  ३७ जागांवर भाजपा, ३२ जागांवर समाजवादी पक्ष, काँग्रेस ८, आरएलडी २ आणि इतर पक्ष एका जागेवर आघाडीवर आहेत. 

लोकसभा सभासद संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि सपा व काँग्रेसचा समावेश असलेल्या इंडिया आघाडी यांच्यात अगदी चुरशीची लढत झाली होती. तर मायावतींचा बहुजन समाज पक्षही येथे लढतीत होता. लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ७५ आणि भाजपाचे मित्र पक्ष ५ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर इंडिया आघाडीकडून समाजवादी पक्ष ६२, काँग्रेस १७ आणि तृणमूल काँग्रेस एक जागा लढवत आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४faizabad-pcफैजाबादBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी