शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योगींनी सांगितला PDA चा अर्थ, अखिलेश यांना टोमणा अन् 'सपा'च्या आमदारांनाही हसू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 18:13 IST

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आज काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले.

UP Assembly Budget Session: उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आज काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यादरम्यान योगींनी शिवपाल यादव यांचे नाव घेऊन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांचाही समाचार घेतला. योगी म्हणाले की आमचे उपमुख्यमंत्री म्हणाले होते की, त्यांचा पीडीए म्हणजे परिवार डेवलपमेंट अथॉरिटी आहे. त्यांच्या PDA मध्ये इतर लोक आहेत पण काका शिवपाल यादव तिथे नसल्यामुळे त्यांची नेहमी फसवणूक होते. न्याय कधी मिळणार यासाठी एकदा महाभारत वाचा. 

खरं तर योगी आदित्यनाथ यांच्या या विधानंतर सभागृहात एकच हशा पिकला. भाजपा आमदारांसह समाजवादी पार्टीच्या आमदारांना देखील हसू अनावर झाले. 'सपा'च्या लोकांनी प्रभू श्रीरामावर विश्वास ठेवला असता तर ते आपल्या काकांना विसरले नसते, असेही योगींनी नमूद केले.

योगी यांचा अखिलेश यांना टोमणातसेच २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशवर राज्य करणारे लोक त्यांनी राज्याला कुठे नेले? त्यांनी उत्तर प्रदेशातील लोकांसाठी मोठे संकट निर्माण केले होते. येथील तरुणाईला ओळख लपवण्यास भाग पाडले. येथील तरुण कुठेही गेला तरी त्याला नोकरी मिळत नव्हती. भाड्याच्या खोल्या विसरा, हॉटेल्स, धर्मशाळांमध्येही खोल्या मिळत नव्हत्या. आता उत्तर प्रदेशने २२ जानेवारी २०२४ ची घटना पाहिली आहे, अशा शब्दांत योगींनी अखिलेश यांना लक्ष्य केले. 

योगी आदित्यनाथ राम मंदिराबद्दल म्हणाले की, आज प्रत्येकजण दिव्य आणि भव्य अयोध्या पाहून भारावून जात आहे. हे काम खूप आधी व्हायला हवे होते. अयोध्येतील लोकांसाठी विजेची व्यवस्था करता आली असती. तिथे चांगल्या आरोग्य सुविधा पुरवता आल्या असत्या. ही विकासकामे कोणत्या उद्देशाने थांबवली गेली? मी केवळ अयोध्या आणि काशीला गेलो नसून नोएडा आणि बिजनौरला देखील गेलो आहे. तिथे कामे केली आहेत. 

अखिलेश यांचा सरकारला प्रश्न समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारला प्रश्न विचारताना म्हटले, "तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेबाबत शून्य सहनशीलता म्हणता, मग महिलांवर सर्वाधिक गुन्हे का होत आहेत? सर्वाधिक घटना त्यांच्याविरुद्ध का होत आहेत? देशात गुन्हेगारी वाढत आहे. देशात गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेश सर्वात आघाडीवर का आहे?"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाRam Mandirराम मंदिरSamajwadi Partyसमाजवादी पार्टी