शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
2
12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये
3
शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना आपली संपत्ती..."
4
मालेगावनंतर बीड हादरले! साडेपाच वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाचा अत्याचार, ४ दिवस वेदनेत
5
उबर कंपनीत परप्रांतीय आणि स्थानिक चालकांमध्ये भेदभाव? ड्रायव्हर्सचे कार्यालयाबाहेर आंदोलन
6
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
7
सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
8
IND vs SA 2nd Test Day 4 : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०८ धावांची आघाडी घेतली, तरी...
9
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
10
"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
12
पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
13
Ayodhya Ram Mandir: अयोध्येचे राम मंदिर होऊन वर्ष होत आले, मग ध्वजारोहण सोहळा आता का? 
14
इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...
16
ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...
17
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
18
Champashashthi 2025: २६ नोव्हेंबर चंपाषष्ठी, खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता; 'अशी' करा पूजा!
19
इथिओपियाहून भारतात आलेले राखेचे ढग कधी कमी होणार? या शहरांवर परिणाम होणार, हवामान विभागाने दिली माहिती
20
मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:04 IST

Mohan Bhagwat at PM Modi Ayodhya Ram Temple Flag Hoisting Live: "ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; त्यांच्या आत्म्याला आज समाधान मिळाले असेल"

Mohan Bhagwat at PM Modi Ayodhya Ram Temple Flag Hoisting Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजा (धार्मिक ध्वज) फडकवली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतदेखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी दिल्लीहून महर्षी वाल्मिकी विमानतळावर पोहोचले आणि तेथून हेलिकॉप्टरने साकेत कॉलेजला पोहोचले. साकेत कॉलेजहून पंतप्रधान मोदी रोड शो च्या माध्यमातून पुढे राममंदिरात पोहोचले आणि त्यांनी मूळ मंदिरात धर्मध्वजा फडकवली.

"या दिवसासाठी अनेक रामभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मंदिर बांधण्यास वेळ लागतो. हा धर्मध्वज आहे, त्याचा भगवा रंग आहे. या धर्मध्वजात रघुकुलाचे प्रतीक असलेले कोविदार वृक्ष आहे. कोविदार वृक्ष हे दोन पवित्र वृक्षांच्या गुणांचे मिश्रण आहे. आपल्याला धर्मध्वज शिखरावर उंचावायचा आहे. आजचा दिवस आपल्या संकल्पाची पूर्ती करण्याचा दिवस आहे. आपल्याला शांती पसरवणारा आणि सर्वांना समृद्धी देणारा भारत स्थापन करायचा आहे. हे मंदिर काही लोकांनी स्वप्नात पाहिले होते, आज तसे मंदिर 'याचि देही याचि डोळा' पाहायला मिळणे ही शुभ गोष्ट आहे," अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी भावना व्यक्त केल्या.

"आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. इतक्या लोकांनी स्वप्न पाहिले, इतक्या लोकांनी प्रयत्न केले, इतक्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; आज त्यांच्या आत्म्याला समाधान मिळाले असेल. आज अशोकजींना खरोखरच शांती मिळाली असेल. त्यांनी आपले प्राण अर्पण केले आणि अनेकांनी घाम गाळला. काहींनी बलिदान दिले, पण जे मागे राहिले त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांच्या मनात मंदिर बांधले जावे अशी इच्छा सतत होते. आज राम मंदिर बांधण्याची शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण झाली. ध्वज फडकवण्यात आला. आम्ही ते आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला याचा मला अभिमान आहे," असेही मोहन भागवत म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Temple Inauguration: Bhagwat calls for a prosperous India.

Web Summary : Mohan Bhagwat attended the Ayodhya Ram Temple flag hoisting with PM Modi. Bhagwat hailed the day as fulfillment of a long-held dream. He emphasized building a peaceful, prosperous India, acknowledging sacrifices made for the temple. He expressed pride in witnessing the temple's completion.
टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरMohan Bhagwatमोहन भागवतUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी