शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवरील व्हिडिओनं उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:46 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. गोरखपूरला लागून असलेल्या बस्ती जिल्ह्यातील गोर पेलीस ठाण्याच्या ...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. गोरखपूरला लागून असलेल्या बस्ती जिल्ह्यातील गोर पेलीस ठाण्याच्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हादेखील दाखल केला आहे. एका व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये हा धमकीचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर, ‘ग्रुप अ‍ॅडमिन’ने ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. 

गौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगिया गावातील रहिवासी अभिषेक कुमार दुबे यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. ते म्हणाले, आपण 'सनातन धर्म सर्वोपरी' या नावाने एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चालवतो. ओपन लिंकद्वारे एक अनोळखी नंबरही ग्रुपमध्ये सहभागी झाला. या नंबरवरून ग्रुपवर एक व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. साधारणपणे ११ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन लोक बोलताना ऐकू येत आहे. एक व्यक्ती मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्यासंदर्भातत बोलत आहे. तर दुसरा त्याला सहमती दर्शवत आहे. महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा चेहराही दिसत आहे.

यासंदर्भात अभिषेकने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या क्रमांकावरून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, त्यावर फोन करून आपण विचारणा केली असता, संबंधित व्यक्तीने तो व्हिडिओ त्यानेच तयार केला असल्याचे कबूल केले आहे. यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करून यासंदर्भात तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात हा मोबाईल क्रमांक कासगंज जिल्ह्यातील एका व्यक्तीचा असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे प्रभारी पोलिस स्टेशन अधिकारी विनय प्रताप सिंह यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सीओ हरैया कार्यालयातील निरीक्षक संजय सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. खरे तर, यापूर्वीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना, अशा प्रकराच्या धमक्या मिळाल्या आहेत. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपBJPभाजपाBombsस्फोटके