शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

CM पदावरून योगी आदित्यनाथांना हटवण्याची होती तयारी, पण...?; पुस्तकात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 13:30 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा भाजपाला उत्तर प्रदेशात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यातच योगी आदित्यनाथ यांच्याबाबत अनेक वावड्या राज्यात उठत आहेत. 

लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जेलमधून बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचारात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठं विधान केले होते. पुढील निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना बाजूला सारलं जाणार असा दावा केजरीवालांनी केला होता. त्यावर भाजपाने प्रत्युत्तरही दिलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा योगी चर्चेत आले आहेत. एका ज्येष्ठ पत्रकाराने लिहिलेल्या पुस्तकात अनेक दावे करण्यात आलेत. ज्यात २०२२ विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना हटवण्याची तयारी झाली होती असं म्हटलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार श्यामलाल यादव यांच्या At The Heart of Power - The Chieft Ministers of Uttar Pradesh हे पुस्तक समोर आलं आहे. त्यात लिहिलंय की, उत्तर प्रदेशात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीला केवळ ९ महिने बाकी होते. त्यावेळी लखनौपासून दिल्लीपर्यंत भाजपा आणि आरएसएस नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रि‍पदावरून हटवण्याचं ठरवलं गेले. मात्र नेतृत्वात बदल करण्याआधीच भाजपा पक्षश्रेष्ठींना जाणीव झाली की जर कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच योगींना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर त्याचा पक्षाला फटका बसू शकतो. 

श्यामलाल यादव यांनी त्यांच्या पुस्तकात योगींना CM पदावरून हटवण्यामागची कारणे सांगितली नाहीत. परंतु मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी लिहिलेल्या १६ पानांमध्ये योगी सरकारविरोधात ज्या काही गोष्टी सुरू होत्या त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या काळात केशव प्रसाद मौर्य यांच्यासोबत योगी आदित्यनाथ यांचे संबंध ताणले होते. संघ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे २२ जून २०२१ ला योगी आदित्यनाथ अचानक केशव प्रसाद मौर्य यांना भेटण्यासाठी पोहचले होते. 

या भेटीतून दोन्ही नेत्यांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय हे दाखवण्यात आलं. २०१६ मध्ये केशव प्रसाद मौर्य राज्यात प्रदेशाध्यक्ष बनले होते. त्यानंतर २०१७ ला भाजपाने यूपीत दमदार यश मिळवलं. या विजयानंतर मुख्यमंत्रि‍पदासाठी केशव प्रसाद मौर्य यांच्या नावाची चर्चा सर्वात आघाडीवर होती. परंतु अचानक योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद सुरू झाले होते. 

टॅग्स :BJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश