शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची छेड काढायचे वडील, गावात होत होती बदनामी, संतापलेल्या मुलाने उचललं भयानक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 10:50 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमधील नागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरड गावातून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने बदनामी होत असलेल्या आपल्याच वडिलांची दोरीने गळा आवळून हत्या केली आहे.

उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमधील नागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरड गावातून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने बदनामी होत असलेल्या आपल्याच वडिलांची दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. एसपी (ग्रामीण) सागर जैन यांनी सांगितले की, पिरड गावातील रहिवासी असलेल्या किसन जलधार यांचा मृतदेह तीन डिसेंबर रोजी सकाळी घरातील चौपाईवर सापडला. त्यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञान आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली.

जलधार यांची हत्या त्यांच्याच निकटवर्तीयाने केलेली असावी, असा पोलिसांना संशय होता. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी जलधार यांचा मुलगा अरुण उर्फ संजय याला चंदेना कोली गावात जाणाऱ्या रस्त्यावरून अटक केली. आरोपीची कसून चौकशी केल्यावर त्याने वडिलांची हत्या केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीने दाखवल्याप्रमाणे हत्येसाठी वापरण्यात आलेली दोरी जप्त केली.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी अरुण याने सांगितले की, माझा वडील जलधार सिंह यांच्यासोबत बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. कारण ते अनेकदा दारूच्या नशेत गावातील महिलांची छेड काढताना पकडले गेले होते. त्यामुळे आमची गावात बदनामी होत होती. त्यामुळेच मी संधी मिळताच वडिलांची हत्या केली. याबाबत सागर जैन एसपी (ग्रामीण) यांनी सांगितले की, एका व्यक्तीती हत्या झाल्याची माहिती आम्हाला ३ डिसेंबर रोजी मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृताच्या मोठ्या मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. मृत व्यक्तीची त्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या मुलासोबत सातत्यानं भांडणं होत असल्याचं समोर आलं. तसेच मृत जलधरा सिंह हे दारूच्या नशेत महिलांची छेड काढत असल्याचे समोर आले होते. त्या दिशेने तपास करत पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार