शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"सपा-काँग्रेसमध्ये जिनांचा आत्मा, सामाजिक फाळणीचा प्रयत्न सुरु"; CM योगींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:39 IST

Yogi Adityanath: जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर साधला जोरदार निशाणा

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. "सपा असो की काँग्रेस, त्यांच्यात पाकिस्तानची फाळणी मागणाऱ्या मोहम्मद अली जिनांचा आत्मा शिरला आहे. देशाची फाळणी करण्याचे पाप जीनांनी केले होते. अखेरच्या क्षणी त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आज विरोधकही समाजात फूट पाडून सामाजिक फाळणीच करत आहेत. सामाजिक जडणघडणीला तडा दिला जात आहे. पण पंतप्रधान मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. ते विरोधी पक्षांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत," अशा शब्दांत आदित्यनाथ यांनी विरोधकांवर टीका केली.

कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, "सपा प्रमुख (अखिलेश यादव) यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. अयोध्या आणि कन्नौजमध्ये मुलींच्या अब्रूशी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी खेळ केला. त्यांच्या सरकारच्या काळात व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण होते. पण सुरक्षा आणि सुशासनाशिवाय राज्याची प्रगती शक्य नाही. युवकांना रोजगार मिळत आहे, गुंतवणूक येत आहे आणि राज्यात विकास होत आहे हे राज्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

अलिगडमधील संरक्षण कॉरिडॉरबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले की, अलिगढच्या डिफेन्स कॉरिडॉरमध्ये एक तोफही तयार केली जाईल, जी शत्रूला गप्प बसवेल. येथे तयार केलेली रायफलदेखील परकीय आक्रमणे पळवून लावण्यात यशस्वी ठरेल.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादव