शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:40 IST

बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे.

मनोज टिबडेवाल आकाश -

नवी दिल्ली : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाच्या वर्षीची लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, असे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

प्रश्न : मैनपुरी येथून आपली पत्नी डिंपल यादव व कनौज येथील लोकसभा मतदारसंघातून आपण स्वत: निवडणूक लढवत आहात. या दोन जागांमध्ये नेमके कोण मतांच्या अधिक फरकाने निवडून येईल?अखिलेश यादव : आपला धर्म व संस्कृती यांच्या तत्त्वांचा विचार केला तर मैनपुरी येथील उमेदवारच मतांच्या अधिक फरकाने निवडून येईल.

प्रश्न : लंडनहून पदवी शिक्षण घेऊन मायदेशात परतलेली अदिती यादव पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर दिसली. आपल्या आईवडिलांसाठी तिने निवडणूक प्रचारही केला. आपली कन्या अदिती हा समाजवादी पक्षाचा भविष्यातील चेहरा आहे का?यादव : राजकारण ही काही सोपी गोष्ट नाही. राजकारणात खूप मेहनत घ्यावी लागते. राजकारण खूप सोपे असते असे वाटणाऱ्या एखाद्याने या क्षेत्रात प्रवेश केला की त्याला या क्षेत्रातील अडचणींची कल्पना येते. इथला प्रवास खडतर आहे.

प्रश्न : उत्तर प्रदेशात निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे, असे आपल्याला वाटते का?यादव : जिथे असे प्रकार घडल्याचा संशय आला, त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. काही ठिकाणी निवडणूक आयोगाने कारवाई केली; तर काही ठिकाणी अद्याप ती झालेली नाही. निवडणूक प्रक्रियेत अनेक अडथळे येऊनही जनता उत्साहाने मतदान करत आहे. यासाठी मी लोकांचे मनापासून अभिनंदन करतो.

प्रश्न : सप व काँग्रेस युती लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशात सर्वांत जास्त जागा जिंकेल असे तुम्ही वारंवार सांगत आहात. आपल्याला पूर्वीपासून पाठिंबा देणाऱ्या यादव, मुस्लिम मतदारांबरोबरच मागासवर्गीय, दलित मतदारांनीही तुमच्यासोबत येणे आवश्यक आहे. तसे घडले तरच तुमचा दावा खरा ठरेल, असे वाटते का?यादव : आम्हांला सर्व वर्गांतील मतदारांचा पाठिंबा आहे. मागासवर्गीय, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्वांचा आम्हांला पाठिंबा आहे. 

प्रश्न : दलित मतदार या लोकसभा निवडणुकांत आपल्यासोबत आहेत असे वाटते का? यादव : मी बहुजन समाजातील लोकांना विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालणाऱ्या लोकांना सांगतो की, बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. बहुजन समाजातील लोक तसेच भारतीय राज्यघटना यांच्याशी भाजपने उभा दावा मांडला आहे. त्यामुळे लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे.

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाcongressकाँग्रेस