लखनौ : लखनौमधील एका हॉटेलमध्ये एका तरुणाने आपल्या चार बहिणींसह आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. आग्रा परिसरातील लोकांनी त्याचे घर हिसकावून घेण्यासाठी त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर अनन्वित अत्याचार केले. त्यांच्या छळाला आणि दडपशाहीला कंटाळून हे कृत्य केल्याचे तरुणाने हत्येनंतर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.
या घटनेनंतर आरोपी मोहम्मद अर्शदला अटक करण्यात आली आहे. अर्शद (२४) असे आरोपीचे नाव असून त्याने आलिया (९), अलशिया (१९), अक्सा (१६), रहमीन (१८) या चार बहिणींसह आणि आई आसमा यांची हत्या केली. काहींच्या मनगटावर तर काहींच्या मानेवर जखमा आहेत. आम्ही याची सविस्तर करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
क्लिपमध्ये काय?व्हिडीओ क्लिपमध्ये अर्शदने पोलिस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कारवाईसाठी आवाहन केले आहे.या हत्येसाठी रानू (ऊर्फ आफताब), अहमद, अलीम खान, सलीम ड्रायव्हर, अहमद रानू, आरिफ आणि अझहर यांना जबाबदार धरले आहे.
हत्येचे कारण काय?- व्हिडीओत अर्शदने म्हटले की, रहिवाशांच्या छळाला आणि दडपशाहीला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले. पोलिसांना हा व्हिडिओ मिळाल्यावर, त्यांनी या सर्वांसाठी परिसरातील लोकांना जबाबदार धरा.- त्याने आरोप केला की त्याच्या परिसरातील लोकांनी त्याचे घर हिसकावून घेण्यासाठी त्याच्या कुटुंबावर अनन्वित अत्याचार केले आहेत. १० दिवस झाले आम्हाला फूटपाथवर झोपण्यास आणि थंडीत भटकण्यास भाग पाडले गेले आहे. आमच्याकडे कायदेशीर कागदपत्रे असूनही आमचे घर आमच्याकडून हिसकावून घेतले आहे. आम्हाला ते मंदिराला समर्पित करायचे होते आणि आमचा धर्म बदलायचा होता.