शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आझम खान मुस्लीम असल्याने त्यांना त्रास दिला जातोय असे भाजपावालेच सांगतात - अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 16:40 IST

समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली.

ज्या उत्तर प्रदेशातून देशाच्या सत्तेचा मार्ग जातो तेथील राजकारणात हिंदू आणि मुस्लीम या दोन बाजू नेहमीच केंद्रस्थानी राहिल्या आहेत. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. अशातच समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली. बुधवारी न्यायालयाने आझम खान यांना मुलगा अब्दुल्ला आझम यांच्या दोन जन्म प्रमाणपत्रांच्या प्रकरणात दोषी ठरवले. अब्दुल्ला आझम यांच्यासह आझम खान आणि त्यांची पत्नी तंझीन फातिमा या तिघांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले.

आझम खान हे मुसलमान असल्यामुळे त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याची टीका अखिलेश यांनी केली. आझम खान यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी भाजपा नेते आकाश सक्सेना यांनी गुन्हा दाखल केला होता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांनी रामपूरच्या स्वार विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि बसपा नेते नवाब काझिम अली खान यांनी अब्दुल्ला आझम यांच्या वयाबाबत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अब्दुल्ला आझम यांचे वय विधानसभेची निवडणूक लढवण्याचे नाही, असा आरोप नवाब काझिम यांनी केला होता.

अखिलेश यादवांची भाजपावर टीका आझम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षा जाहीर झाल्यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, "आझम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल. त्यांच्याविरोधात एक मोठा कट रचला जात आहे. या कटामुळेच आज त्यांना अशी शिक्षा भोगावी लागत आहे. भाजपामध्येच असलेले काही लोक सांगतात की, आझम खान मुस्लिम आहेत, म्हणूनच त्यांना अशी शिक्षा भोगावी लागत आहे."

आझम खान यांना ७ वर्षांची शिक्षादरम्यान, शैक्षणिक प्रमाणपत्रांमध्ये अब्दुल्ला आझम यांची जन्मतारीख १ जानेवारी १९९३ आहे, तर त्यांच्या जन्म प्रमाणपत्रात ३० सप्टेंबर १९९० दाखवण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अब्दुल्ला आझम यांनी सादर केलेले जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आणि स्वार मतदारसंघातून त्यांची निवडणूक रद्द केली. अब्दुल्ला आझम यांनी २०१७ मध्ये निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. पण तरीही त्यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली. 

अब्दुल्ला आझम यांनी रामपूरच्या स्वार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तेव्हा शफीक अन्सारी त्यांचे प्रस्तावक होते. आता शफिक अन्सारी अपना दलात असून ते तिथे आमदार झाले आहेत. मात्र, २०१७ मध्ये अब्दुल्ला आझम स्वार मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. त्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. रामपूरचे भाजपा आमदार आकाश सक्सेना यांनी अब्दुल्ला आझम यांच्याविरुद्ध रामपूरच्या गंज पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये दोन जन्म प्रमाणपत्रे असल्याचा गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये आझम खान आणि त्यांची पत्नी तंझीन फातिमा यांनाही आरोपी करण्यात आले होते. आता न्यायालयाने आझम खान, अब्दुल्ला आझम आणि तंझीन फातिमा यांना दोषी ठरवले असून तिघांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाMuslimमुस्लीम