मेहुणीशी संबंध हे अनैतिकच पण बलात्कार म्हणू शकत नाही; गंभीर प्रकरणात उच्च न्यायालयाचा दाजींना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:38 IST2025-01-01T13:38:04+5:302025-01-01T13:38:32+5:30

अनैतिक संबंधातून हत्या, बलात्काराचे आरोप अशी प्रकरणे वेळोवेळी समोर येत असतात. नुकताच पुण्याच्या आमदाराच्या मामाचा अशाच अनैतिक संबंधातून खून करण्यात आला होता.

Relationship with sister-in-law is not only immoral but cannot be called rape; Allahabad High Court gives relief to mother-in-law in serious case | मेहुणीशी संबंध हे अनैतिकच पण बलात्कार म्हणू शकत नाही; गंभीर प्रकरणात उच्च न्यायालयाचा दाजींना दिलासा

मेहुणीशी संबंध हे अनैतिकच पण बलात्कार म्हणू शकत नाही; गंभीर प्रकरणात उच्च न्यायालयाचा दाजींना दिलासा

अनैतिक संबंधातून हत्या, बलात्काराचे आरोप अशी प्रकरणे वेळोवेळी समोर येत असतात. नुकताच पुण्याच्या आमदाराच्या मामाचा अशाच अनैतिक संबंधातून खून करण्यात आला होता. अलाहाबादमधील एका दाजी-मेहुणीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्यातील संबंध अनैतिक आहेत पण ते बलात्काराच्या श्रेणीत नाहीत, असे म्हणत दाजीला जामिन दिला आहे. 

नात्याने ही तरुणी मेहुणी लागते. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप दाजीवर ठेवण्यात आला होता. यावर कोर्टाने दोघांतील प्रेम संबंध अनैतिक जरी असले तरी हा लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा होत नाही, असे म्हटले आहे. 

आरोपी दाजीविरुद्ध भादंवि कलम ३६६, ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आपल्या मेहुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि नंतर तिला पळवून नेल्याचा आरोप आहे. आरोपीने अलाहाबाद उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने भाष्य केले.

मुलगी प्रौढ आहे आणि तिचे प्रेमसंबंध होते, यावरही न्यायालयाने विचार केला. दाजीला जुलै 2024 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्या आधारे न्यायालयाने त्यांची याचिका मान्य करून त्यांना जामीन मंजूर केला.

Web Title: Relationship with sister-in-law is not only immoral but cannot be called rape; Allahabad High Court gives relief to mother-in-law in serious case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.