शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : ४ हजार साधू, ८८० उद्योगपती, ९३ खेळाडू... ७ हजारांहून अधिक पाहुण्यांमध्ये कोण-कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 10:26 IST

Ram Mandir Inauguration : या सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे.

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२२ जानेवारी) अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन काही तासांतच करणार आहेत. उद्घाटनापूर्वी रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील सुमारे ७१४० हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश- विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री रामजन्मभूमी ट्रस्टने २५८ न्यायाधीश, वकील आणि कायदेतज्ज्ञांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. याशिवाय ३० वैज्ञानिक, संरक्षण विषयाशी संबंधित ४४ अधिकारी, १५ कलाकार, ५० शिक्षणतज्ज्ञ, १६ साहित्यिक, ९३ खेळाडू, ७ डॉक्टर्स, ३० प्रशासकीय अधिकारी, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाशी संबंधित सुमारे १६४ लोक, आर्किओलॉजिस्टमधील ५ लोक, ८८० उद्योगपती, ४५ अर्थतज्ज्ञ, ४८ राजकीय पक्षांचे नेते, १०६ संघ आणि विहिंपशी संबंधित नेते, १५ श्री रामजन्मभूमी ट्रस्टशी संबंधित लोक, ९२ अनिवासी भारतीय, ४५ राजकीय कार्यकर्ते, ४०० कामगार, ५० कारसेवकांच्या कुटुंबीयांतील लोक आणि ४००० साधूंना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी बहुतांश आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

'या' बड्या व्यक्तींना आमंत्रणप्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ज्या मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय, रतन टाटा, गौतम अदानी, अनिल अग्रवाल, हिंदुजा समूहाचे अशोक हिंदुजा, अझीम प्रेमजी, नुस्ली वाडिया, टोरेंट समूहाचे सुधीर मेहता, जीएमआर समूहाचे जीएमआर राव, निरंजन हिरानंदानी, कुमार मंगलम बिर्ला, अजय पिरामल आणि आनंद महिंद्रा यांचा समावेश आहे.

कलाकारांना सुद्धा आमंत्रणअमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, आशा भोसले, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, प्रसून जोशी, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय क्रिकेट जगतातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली, हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांसारख्या अनेक खेळाडूंना सुद्धा आमंत्रित करण्यात आले आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश